लग्न समारंभात जाण्याआधी शॉपिंग तो बनती है बॉस! छान छान कपडे, दागिने यासोबतच वर आणि वधू गिफ्ट काय द्यावं, हा महत्वाचा प्रश्न पडतोच. गिफ्ट कसे असावे? तर ट्रेंडी, स्वस्त आणि मस्त! भेटवस्तू चांगली दिसायला हवी, मात्र खिशाला परवडणारी असायला हवी ना राव… तर मित्रांनो, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आम्ही तुमच्यासाठी काही खास गिफ्ट्स घेऊन आलो आहोत, या गिफ्टची खासियत म्हणजे एक गोड आठवण म्हणून लक्षात राहील आणि वर-वधूला उपयोगी देखील पडेल. (Marriage Gifts)
१. किसिंग डक स्वॅन लव्ह कपल बर्ड स्टॅच्यूज :
हे पांढऱ्या धातूचे स्वॅन लव्ह बर्ड्स प्रेम आणि जोडप्यांनी सदैव एकत्र असण्याचे प्रतिक आहेत. शो पीस म्हणून तुम्ही याचा वापर करु शकता आणि तुमच्या प्रेमाला बहर देऊ शकता. (Marriage Gifts)
२. 3D इल्युजन फोटो टेबल नाईट लॅम्प :
या नाईट लॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे यात जोडप्यांचा फोटो असतो. ही एक अनोखी असून सदैव लक्षात राहते. (Marriage Gifts)
(हेही वाचा – Congress देशात समाजविघातक कृत्य करण्याच्या तयारीत; पंतप्रधान मोदी यांचा गौप्यस्फोट)
३. सिल्व्हर प्लेटेड लक्ष्मी गणेश ट्री आयडॉल :
ही सुंदर रचलेली ऑक्सिडाइज्ड फिनिश मूर्ती आहे. नव्या जोडप्याला आशीर्वाद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून घरात तुम्ही ठेवू शकता. (Marriage Gifts)
४. जर्नी बॉक्स :
नवविवाहित जोडपं म्हटलं की सारखा सारखा प्रवास होणारच. अशा वेळी त्यांना ट्रॅव्हल बॉक्स भेट देता येईल. यामध्ये प्रवासादरम्यान लागणार्या आवश्यक वस्तू असतात. यामुळे प्रवास त्रासमुक्त होतो. (Marriage Gifts)
५. सिरॅमिक मार्बल फिनिश कॉफी मग :
हे एक परवडणारे, स्वस्त आणि स्टायलिश गिफ्ट आहे. सकाळची सुरुवात या रोमॅंटिक कॉफी मगमधून कॉफी घेऊन केल्याने प्रेम आणखी वाढते. (Marriage Gifts)
६. राधा कृष्ण पेंटिंगचा सेट :
या बहुरंगी लाकडी चित्रांमध्ये राधा आणि कृष्ण या दैवी जोडप्याचे चित्र रेखाटलेले असते. राधा आणि कृष्णाचा फोटो ज्या घरात असतो, त्या घरात प्रेम आणि समृद्धी नांदते असं म्हणतात. (Marriage Gifts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community