-
ऋजुता लुकतुके
मारुती बलेनो २०२५ (Maruti Baleno 2025) भारतात लाँच झाल्यापासून आता बाजारपेठेत चांगलीच स्थिरावली आहे. मारुती सुझुकीची बलेनो ही लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. आणि शहरांबरोबरच लांब पल्ल्याच्या प्रवासातही उपयुक्त ठरणारी ही कार अजूनही लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. आताही बलेनो २०२५ कारचं पेट्रोल इंजिन आणि एएमटी गाडी लोकांच्या पसंतीस उतरली आहेत. त्याचबरोबर तंत्रज्जानातील आधुनिकता, मोठी केबिन, चांगलं डिझाईन आणि चांगलं मायलेज यामुळे गाडी या सेगमेंटमध्ये आपला ग्राहक टिकवून आहे. आता भारतीय बाजारपेठ बलेनोच्या फेसलिफ्ट व्हर्जनसाठी तयार होत आहे. जून महिन्यात नवीन बलेनो २०२५ (Maruti Baleno 2025) भारतात दाखल होऊ शकते.
गाडीत ३७ लीटर क्षमतेची पेट्रोलची टाकी आहे. आणि ही गाडी एका लीटरमागे २२ किलोमीटरचं मायलेज देऊ शकते. तर शहरांतही ही गाडी १९ किमीचं ॲव्हरेज देते. ही या गाडीची सगळ्यात जमेची बाजू आहे. हॅचबॅक प्रकारात या एका कारणामुळे ही गाडी सगळ्यांत पुढे आहे. तर गाडीतील १,१९७ सीसी पेट्रोल इंजिन ८८.५० बीएचपी इतकी शक्ती निर्माण करू शकतं. ४ सिलिंडर इंजिनबरोबरच यातील एएमटी यंत्रणा ही सगळ्यात सक्षम मानली जाते. त्यामुळे चालकासाठी ही गाडी भरवशाची आहे. (Maruti Baleno 2025)
(हेही वाचा – Central Bank ला भीषण आग; सगळी रोकड जाळून खाक)
Maruti’s premium hatchback the Baleno, offers several new-age features along with adequate space for five occupants. It is easy to drive and remains stable at highway speeds.#maruti #baleno #marutibaleno #cwphotos #cars #automobiles #carupdates #automobileupdates pic.twitter.com/Wxzf6uABog
— CarWale (@CarWale) March 13, 2025
या गाडीत ५ जण आरामात बसू शकतात. तर गाडीतील डिकी ३१८ लीटरची आहे. त्यामुळे सामान वाहून नेण्याच्या बाबतीतही ही गाडी उपयुक्त आहे. ६.८० लाख रुपयांपासून या गाडीची किंमत सुरू होईल. या गाडीची स्पर्धा टाटा टियागो (Tata Tiago) आणि टाटा टिगॉर (Tata Tigor) या गाड्यांशी असेल. मारुतीच्या हॅचबॅक गाड्यांमध्ये एडीएएस ही चालकांना धोक्याच्या सूचना देणारी यंत्रणा पहिल्यांदा बसवलेली ही कार असू शकते. (Maruti Baleno 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community