
-
ऋजुता लुकतुके
भारत मोबिलिटी एक्स्पोमध्ये या वर्षाच्या सुरुवातीला अनेक कार डिस्प्ले झाल्या. यात मारुतीची नवीन व्हिटारा (Maruti e Vitara) कार सगळ्याचं लक्ष वेधून घेत होती. आता गेले काही दिवस या कारचं टेस्ट ड्राईव्ह सुरू झालेलं दिसत आहे. भारतीय रस्त्यांवर ही कार चाचणीसाठी धावत आहे. ही पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक एसयुव्ही आहे. आणि आता ती बाजारात उतरण्याच्या प्रतीक्षेत आहे. पूर्णपणे भारतात बनलेली ही कार मारुतीची पहिली पूर्ण इलेक्ट्रिक कार असेल. हेच तिचं पहिलं वैशिष्ट्य असेल. भारतात गुजरातमध्येच (Gujarat) ती तयार होणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये गाडीचं प्रत्यक्ष उत्पादनही सुरू होईल. विशेष म्हणजे भारतातूनच ही गाडी परदेशातही निर्यात होणार आहे. युरोप तसंच जपानमध्ये भारतातील ५० टक्के गाड्या निर्यात होणार आहेत. अशा सगळ्या गोष्टींमुळे भारतीयांना या गाडीची उत्सुकता आहे.
भारतातील इलेक्ट्रिक गाड्यांची बाजारपेठ अजून पुरेशी विकसित झालेली नाही. अनेक गाड्यांमध्ये जुनं आयसीई इंजिन (ICE engine) इलेक्ट्रिकमध्ये बदलेलं असतं. तर गाड्यांच्या एकूण खपात इलेक्ट्रिक गाड्यांची विक्री फक्त ३ टक्के आहे. आता मारुती इ व्हिटारापासून (Maruti e Vitara) भारतात बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या सुरू होत आहेत. मागोमाग महिंद्रा बी, टोयोटा अर्बन क्रूझर अशा गाड्याही लाईनीत आहेत.
(हेही वाचा – kuno sanctuary : ‘कुनो’मधील ‘ते’ चित्ते आता मोकळ्या जंगलामध्ये फिरणार !)
Maruti Suzuki’s First Electric, e Vitara, the #SUV eBorn is worth the wait. Witness it come alive at the Bharat Mobility Show 2025 on the 17th of January.#eVitara #SUVeBorn #MS1stElectricSUV#MarutiSuzuki #Maruti #Suzuki #Rcbhargava #Kenichiayukawa #HisashiTakeuchi #OsamuSuzuki pic.twitter.com/qvZXZRmURL
— MARUTI SUZUKI (@marutisuzukiof2) January 3, 2025
इ व्हिटारामध्ये (Maruti e Vitara) बॅटरीचे दोन पर्याय असतील. ४९ केडब्ल्यूएच आणि ६१ केडब्ल्यूएच. तसंच फ्रंट – व्हील – ड्राईव्ह आणि ऑल – व्हील – ड्राईव्ह असे पर्यायही गाड्यांमध्ये उपलब्ध असतील. बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर ती गाडी ५०० किमींचं अंतर कापू शकेल असा अंदाज आहे. भारतात इ व्हिटाराची (Maruti e Vitara) किंमत १७ ते १८ लाखांपासून सुरू होईल.
गाडीत एलईडी दिव्यांबरोबरच डिजिटल डिस्प्ले, वायरलेस चार्जर, चटस्क्रीन इन्फोटेनमेंट, अद्ययावत म्युझिक प्रणाली असा सोयीही असतील. चालकाच्या सुरक्षेसाठी यात एडीएएस प्रणालीही असेल.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community