-
ऋजुता लुकतुके
मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य आणि खूप जुनी ऑटोमोबाईल कंपनी आहे. सर्वांना परवडणाऱ्या हॅचबॅक पासून ते एसयुव्ही कार बनवणारी ही कंपनी आहे. कंपनीचं मुख्य कार्यालय पुणे इथं आहे. कारच्या उत्पादनाबरोबरच ही कंपनी कारच्या विक्रीसाठी देशभरात हजारो शोरुमही चालवते. त्यामुळे कंपनीत सर्व प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. कंपनीने वेळोवेळी दिलेल्या नोकरीसाठीच्या जाहिराती आणि उमेदवारांची केलेली निवड यांचा डेटा लक्षात घेतला तर कर्मचाऱ्यांना कंपनीत काय पगार मिळतो याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. (Maruti Suzuki)
(हेही वाचा- Congress : काँग्रेसने आणला घरातील ‘शौचालय कर’; स्वच्छतागृह वापरण्यासाठी मोजावे लागणार पैसे)
कामाचा पूर्वानुभव नसलेल्या म्हणजेच फ्रेशरला मारुती सुझुकी कंपनीत सरासरी वार्षिक १,९९,९९९ रुपये इतका पगार मिळतो. म्हणजेच महिन्याला १६,६६७ रुपये इतका सरासरी पगार अननुभवी माणसाला मिळतो. पण, यातही कामाचं स्वरुप, मिळालेलं पद, शैक्षणिक पात्रता यावरून हा आकडा कमी जास्त असू शकतो. कंपनीत अभियंते, व्यवस्थापक, तंत्रज्ज यांच्याबरोबरच अगदी गाडीची देखभाल व दुरुस्ती करणारे कामगारही कामासाठी हवे असतात. या सगळ्यांचा पगार अर्थातच वेगवेगळा आहे. (Maruti Suzuki)
सध्या कंपनीचे भारतातील एकूण कर्मचारी १६,५०० इतके आहेत. ३४ शहरांमध्ये कंपनीची शोरुम आहेत. कंपनीच्या धोरणानुसार, देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमधील उत्तीर्ण विद्यार्थीच कंपनी आपल्या सेवेत घेत असते. त्यासाठी विविध संस्था आणि विद्यापीठांमध्ये जाऊन कंपनी कॅम्पस मुलाखतीही आयोजित करते. पद, योग्यता तसंच पात्रता यांचा विचार करून अननुभवी लोकांचा पगार ठरवला जातो. (Maruti Suzuki)
(हेही वाचा- Kalyan News : ट्रेनमध्ये सापडलेली २० लाखांची रोकड कल्याण पोलिसांच्या ताब्यात)
वित्त, अभियांत्रिकी विभाग तसंच कुशल तंत्रज्ज याविभागांमधील नवीन लोकांना कंपनीत सरासरी ३३,५००० रुपये महिला इतका पगार मिळतो. तर कामगार वर्ग किंवा प्रशासकीय कामांसाठी १६,५०० रुपये इतका सरासरी मासिक पगार मिळतो. याशिवाय कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना कँटिनमध्ये मोफत जेवण, प्रवास भत्ता अशा सुविधा देऊ केल्या आहेत. (Maruti Suzuki)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community