आजपासून माथेरान पर्यटकांसाठी खुले! 

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवार, 26 जूनपासून माथेरान अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंदावली आहे. पर्यटनस्थळ असलेल्य माथेरानमध्ये सुध्दा बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शनिवार, 26 पासून माथेरान अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

यामुळे  पावसाच्या काळात पर्यटकांना माथेरानमध्ये निसर्गाच्या सान्निध्यात भटकंती करता येणार आहे. अगोदरच आगाऊ बुकिंग केलेल्या पर्यटकांची तसेच नवख्या पर्यटकांची शनिवारपासून मोठया प्रमाणावर इथे इनकमिंग पहावयास मिळणार आहे. पर्यटकांच्या आगमनामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. माथेरान सुरू व्हावे यासाठी इथल्या सर्व राजकीय पक्षांच्या मंडळींनी आपापल्या परीने प्रयत्न करत होते.

(हेही वाचा :राज्याला ‘डेल्टा प्लस’चा धोका! राज्य सरकारने केल्या ‘या’ सूचना! )

स्थानकाचे जीवन पर्यटनावर अवलंबून!

लॉकडाऊन काळात स्थानिकांची अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झाली होती. इथे अन्य व्यवसाय नसल्यामुळे केवळ पर्यटनावर अवलंबून असणारे सर्व व्यापारी वर्ग, नागरिक, कष्टकरी लोक माथेरान अनलॉक होण्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते. जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे. रायगड जिल्ह्यातील माथेरान एक प्रमुख हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी दररोज पर्यटकांची वर्दळ असते. विकेंड आणि पावसासाळ्यात या ठिकाणी अधिक गर्दी असते. कोरोनामुळे मात्र मागील दीड वर्ष या ठिकाणी अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते, परंतु आता जिल्हा प्रशासनाने येथील पर्यटन व्यवसाय सुरु केल्याने स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here