Mazagon Dock Share Price : माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी परतली

Mazagon Dock Share Price : महिनाभरात शेअर २० टक्क्यांनी वाढला.

44
Mazagon Dock Share Price : माझगाव डॉकच्या शेअरमध्ये तेजी परतली
  • ऋजुता लुकतुके

भारतीय शेअर बाजारात गेले दोन महिने पसरलेली मंदी आता हळू हळू ओसरताना पाहून गुंतवणूकदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. सलग पाच महिन्यांच्या घसरणीनंतर मार्च महिन्यात निफ्टी आणि सेन्सेक्स हे निर्देशांक आता ३ टक्क्यांनी वर आले आहेत. महागाई कमी होणं तसंच कच्च्या तेलाच्या किमती स्थिर झाल्यामुळे हा परिणाम शेअर बाजारावर दिसत आहे. अशा सकारात्मक वातावरणात भारतीय अर्थव्यवस्थेचा आधार असलेल्या संरक्षण सामुग्री बनवणाऱ्या माझगाव डॉकयार्ड कंपनीचा शेअरही या महिन्यात तब्बल २० टक्क्यांनी वाढला आहे. (Mazagon Dock Share Price)

नरेंद्र मोदी सरकारने इथून पुढे संरक्षण सामुग्री उत्पादनावर भर दिला आहे. आणि त्यादृष्टीने आखणीही सुरू आहे. त्यामुळे एचएएल, माझगाव डॉकयार्ड या कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा कल आहे. माझगाव डॉकयार्ड शेअर नफारुपी विक्रीमुळे शुक्रवारी १.७१ टक्के किंवा ४५ अंशांनी पडला. पण, एरवी महिनाभरात शेअरमध्ये २० टक्क्यांची वाढ झाली आहे. (Mazagon Dock Share Price)

(हेही वाचा – Google Pixel 9a : गुगल पिक्सेल ९ए भारतात लाँच; ४९,९९९ रुपये किंमत)

New Project 2025 03 23T075138.131

या वाढीची ढोबळ कारणं समजून घेऊया. १८ मार्चला जर्मनीत अर्थसंकल्प सादर झाला आणि जीडीपीच्या एक टक्के इतका निधी तिथे संरक्षण सामुग्री खरेदी आणि निर्मितीवर खर्च होणार आहे. अनेक देश संरक्षण सामुग्रीसाठीची तरतूद वाढवत आहेत. आणि तेच भारतातही पाहायला मिळत आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्रातील शेअरवर सध्या लोकांचं लक्ष आहे. (Mazagon Dock Share Price)

भारतात अवजड उद्योगांमध्ये देशांतर्गत गुंतवणूकही वाढली आहे. तर परदेशी गुंतवणूकीचा ओघही वाढला आहे. परिणामी, भारताची या क्षेत्रातील निर्यातही वाढत आहे. त्याचा परिणाम माझगाव डॉकयार्ड सारख्या कंपनीच्या कामगिरीवर जाणवत असून शेअरमध्ये तेजी आहे. (Mazagon Dock Share Price)

भारतीय बाजारांत मिड-कॅप कंपन्यामध्ये गुंतवणुकीचा ओघ पुन्हा एकदा सुरू झाला आहे आणि माझगाव डॉक ही विश्वसनीय मिडकॅप कंपनी मानली जाते. त्यामुळेही इथं गुंतवणूक वाढू शकते. कंपनी न्हावाशिवा इथं प्रकल्प विस्ताराची तयारीही करत आहे. ते पाहता येणारा काळ कंपनीसाठी चांगला असू शकतो. (Mazagon Dock Share Price)

(टीप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची असते. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जोखमीवर यात गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.