एकेकाळी स्ट्रगल करणार्या मुलाने आज ९० लाखांची कार घेतली आहे. या तरुणाचं नाव आहे प्रफुल्ल बिल्लोरे. MBA ChaiWala या नावाने ओळखला जाणारा प्रफुल्ल बिल्लोरे सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतो. हल्लीच त्याचा एक व्हिडिओ इन्स्टावर व्हायरल झाला आहे. प्रफुल्ल बिल्लोरे याने तब्बल ९० लाखांची कार खरेदी केली आहे.
आज त्याचं हे यश पाहून त्याने घेतलेले कष्ट मात्र विसरता कामा नये. प्रफुल्ल बिल्लोरेचा जन्म १४ जानेवारी १९९६ रोजी मध्य प्रदेशमध्ये झाला. त्याने कॉमर्समध्ये पदवी घेतली. त्यानंतर Amway मध्ये सेल्समनची नोकरी करत असताना रु. २५०००/- इतका पगार होता. त्याला IIM Ahmedabad मधून एमबीए करायचं होतं. एमबीए केल्यावर चांगला पगार मिळतो असं त्याला वाटत होतं.
पण तो CAT च्या परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही. मग आता काय करायचं हा प्रश्न त्याच्यासमोर होता. तो निराश झाला. त्याला वाटत होतं की आता काहीच होणार नाही. त्याने काही शहरांमध्ये प्रवास केला. मग अहमदाबादमध्ये स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. त्याला Mcdonald’s मध्ये नोकरी मिळाली. आधी हाऊसकिपिंग, नंतर किचन आणि त्यानंतर कॅशियर झाला. पण पगार फारसा मिळत नव्हता. फार फार तर महिन्याला ६००० रुपये तो कमवत होता.
नोकरी करुन आपलं भविष्य उज्वल होणार नाही असं त्याला वाटू लागलं. व्यवसाय करायचा तर मोठी गुंतवणूक हवी. त्याला पैसे मागायला लाज वाटत होती. अखेर त्याने वडिलांकडून ८०००/- रुपये उधार घेतले आणिप्रफुल्ल बिल्लोरे या तरुणाने चहाचा स्टॉल सुरु केला, MBA ChaiWala… आधी केलेल्या कामाच्या अनुभवाचा त्याला आपल्या व्यवसायात फायदा झाला. सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही, मात्र काही काळाने १०,००० कप चहा विकू लागला.
प्रफुल्ल बिल्लोरे या तरुण उद्योगपतीने कार घेताना इन्स्टावर शेअर केलेला व्हिडिओ:
https://www.instagram.com/reel/CojxJRUDi_V/?utm_source=ig_embed&ig_rid=c925e274-018a-48d0-ac15-90c7b0c20d7b
आता तो एक यशस्वी उद्योगपती आहे. तरुणांचा आदर्श आहे. त्याने ९० लाखांची कार विकत घेतली आहे. त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. अनेक खडतर अनुभवांतून त्याला हे यश प्राप्त झाला आहे. यश म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला तर MBA ChaiWala हे एक उत्तम उदाहरण ठरेल.
Join Our WhatsApp Community