Medical laboratory technician salary : भारतात लॅब टेक्निशियनचा पगार किती असतो?

63
Medical laboratory technician salary : भारतात लॅब टेक्निशियनचा पगार किती असतो?
Medical laboratory technician salary : भारतात लॅब टेक्निशियनचा पगार किती असतो?

लॅब टेक्निशियन म्हणून बऱ्याच वर्षांचा अनुभव मिळवल्यानंतर भारतामध्ये लॅब टेक्निशियनचा सरासरी पगार रु. २.१ लाख प्रतिवर्षं एवढा आहे. लॅब टेक्निशियनसाठी सुरुवातीला मिळणारा पगार हा रु. ०.२ लाख प्रतिवर्षं एवढा असतो. तर सर्वोच्च पगार हा रु. ४.५ लाख प्रतिवर्षं एवढा असू शकतो. लॅब टेक्निशियनसाठी भारतामध्ये मासिक पगार अंदाजे रु. १४,२८७ ते रु. १५,७९३ एवढा असतो. (Medical laboratory technician salary)

पाच वर्षांचा अनुभव असलेले लॅब टेक्निशियन भारतामध्ये रु. २.२ लाख प्रतिवर्षं एवढी कमाई करू शकतात. सीनियर लॅब टेक्निशियन आणि कॅथ लॅब टेक्निशियन हे अनुक्रमे रु. ३.४ लाख प्रतिवर्षं आणि रु. २.९ लाख प्रतिवर्षं एवढा पगार घेऊ शकतात.

(हेही वाचा – Lucknow charbagh railway stationचं काय आहे वैशिष्ट्य?)

लॅब टेक्निशियनच्या अनुभवानुसार पगार

लॅब टेक्निशियन हा कौशल्य-आधारित व्यवसाय आहे. भारतामध्ये लॅब टेक्निशियनचा पगार ठरवण्यात त्यांच्या कामाचा अनुभव कामी येतो. अनुभवी लॅब टेक्निशियन्सना नवीन टेक्निशियन्सच्या तुलनेत जास्त पगार दिला जातो. कारण त्यांच्याकडे नव्या लोकांपेक्षा जास्त अनुभव, ज्ञान आणि कौशल्ये असतात. खाली दिलेल्या तक्त्यामध्ये अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित लॅब टेक्निशियन्सचे पगार हायलाइट केलेले आहेत. (Medical laboratory technician salary)

अनुभव – पगार प्रतिवर्षं

१ ते २ वर्षे – रु. १.८ लाख
२ ते ३ वर्षे – रु. १.९ लाख
३ ते ४ वर्षे – रु. २.१ लाख
४ ते ५ वर्षे – रु. २.२ लाख

लॅब टेक्निशियनचा पदानुसार पगार

लॅब टेक्निशियन्सना प्रयोगशाळेत वेगवेगळी कामं करावी लागतात. जसे की, नमुने जमा करणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि मग विश्लेषण करणं. तसंच डेटा रेकॉर्डिंग आणि उपकरणांचं व्यवस्थापन इत्यादी.

या व्यवसायात वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळे पगार दिले जातात. काही महत्वाच्या पदांसाठी लॅब टेक्निशियन्सचे पगार खाली दर्शवलेले आहेत.

(हेही वाचा – भगवा आतंकवाद शब्द म्हणायला नको होता; Sushilkumar Shinde यांची कबुली)

कॅथ लॅब टेक्निशियन – रु. २.९ लाख प्रतिवर्षं
●सीनियर लॅब टेक्निशियन – रु. ३.४ लाख प्रतिवर्षं
●टेक्निशियन पगार – रु. २.३ लाख प्रतिवर्षं
●एक्स-रे टेक्निशियन – रु. १.८ लाख प्रतिवर्षं
●एको टेक्निशियन – रु. २.६ लाख प्रतिवर्षं
●पॅथॉलॉजी लॅब टेक्निशियन – रु. २ लाख प्रतिवर्षं
●डायलिसिस टेक्निशियन – रु. २ लाख प्रतिवर्षं
●कार्डिओलॉजी टेक्निशियन – रु. २.२ लाख प्रतिवर्षं

लॅब टेक्निशियनचा त्यांच्या कौशल्यानुसार पगार

प्रयोगशाळेची कामे कौशल्याने पार पाडण्यासाठी आणि योग्य निष्कर्ष देण्यासाठी लॅब टेक्निशियन्सना मल्टिटॅलेंटेड असणं गरजेचं आहे. विविध कौशल्यांनुसार लॅब टेक्निशियन्सचे पगार किती असतात हे खाली नमूद केलं आहे.

●टेक्निशियन ऍक्टिव्हिटी – रु. २.१ लाख प्रतिवर्षं
●DMLT – रु. १.८ लाख प्रतिवर्षं
●MLT – रु. २ लाख प्रतिवर्षं
●बायोकेमिस्ट्री – रु. २.४ लाख प्रतिवर्षं
●पॅथॉलॉजी – रु. २ लाख प्रतिवर्षं
●मायक्रोबायोलॉजी – रु. २.४ लाख प्रतिवर्षं
●डायग्नोस्टिक्स – रु. ३.४ लाख प्रतिवर्षं
●हाइमेटोलॉजी – रु. ३.४ लाख प्रतिवर्षं

(हेही वाचा – भगवा आतंकवाद शब्द म्हणायला नको होता; Sushilkumar Shinde यांची कबुली)

लॅब टेक्निशियनचा पात्रतेनुसार पगार

लॅब टेक्निशियन्सचं काम हे पुष्कळ डीमांडिंग असतं. बहुतेक लॅब टेक्निशियन्सकडे उच्च स्तरीय शिक्षण आणि प्रशिक्षण असतं. पदवीधर असलेल्या व्यक्ती अल्प काळाचा अभ्यासक्रम केलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त कमाई करतात. खाली वेगवेगळ्या पात्रता असलेल्या लॅब टेक्निशियन्सचे पगार लिहिलेले आहेत.

डिप्लोमा – रु. २ ते ४ लाख प्रतिवर्षं
●बॅचलर – रु. २ ते ५ लाख प्रतिवर्षं
●मास्टर्स – रु. ६ लाख प्रतिवर्षं

(हेही वाचा – Rajasthan Accident : राजस्थानमध्ये भीषण अपघात! लग्न समारंभावरून परतत असताना कुटुंबातील १२ जणांचा मृत्यू)

लॅब टेक्निशियन्सचा शहारानुसार पगार

लॅब टेक्निशियन्सचे पगार त्यांच्या काम करण्याच्या ठिकाणांच्या आधारावर मोठ्या प्रमाणात बदलतात. ही एक अतिशय स्पर्धात्मक फिल्ड आहे. या फिल्डमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये लोक काम करू शकतात. भारतातल्या काही प्रमुख शहरांमधले लॅब टेक्निशियन्सचे पगार खाली दिलेले आहेत.

●बंगळुरू – रु. २.७ लाख प्रतिवर्षं
●हैदराबाद – रु. २.७ लाख प्रतिवर्षं
●नवी दिल्ली – रु. २.५ लाख प्रतिवर्षं
●मुंबई – रु. २.५ लाख प्रतिवर्षं
●चेन्नई – रु. २.२ लाख प्रतिवर्षं

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.