भेटा सनीचर म्हणजेच भारतातील खर्‍या मोगलीला; माणूस असूनही लांडग्यांप्रमाणे जगला

331
भेटा सनीचर म्हणजेच भारतातील खर्‍या मोगलीला; माणूस असूनही लांडग्यांप्रमाणे जगला

डिस्नेच्या जंगल बुकमधला मोगली कोणाला माहिती नाही? हल्लीच्या मध्यमवर्गीयांचे तसेच तरुणांचे बालपण हे मोगलीचे कार्टून पाहूनच गेले आहे. मोगली एक असा मुलगा असतो जो घनदाट जंगलामध्ये राहत असतो. त्या जंगलातले प्राणी त्याचं पालन पोषण करतात. मोगली अगदी लहानपणापासून जंगलातच राहत असल्याने तो देखील तिथे राहणाऱ्या प्राण्यांप्रमाणे आपलं आयुष्य जगत असतो. ही कथा तर सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? की, ही मोगलीची कथा एखादी कल्पना नाही तर सत्यघटना आहे. एवढेच नव्हे तर ही भारतात घडलेली घटना आहे. खरा मोगली भारतातच राहत होता.

सन १९८९ भारतातील बुलंदशहर इथल्या जंगलांमध्ये एक सहा वर्षांचा मुलगा सापडला होता. तो लांडग्यांच्या मुलांसोबत वाढला आणि त्यांच्यासारखाच तो वागत होता. त्याच्या सगळ्या सवयीदेखील लांडग्यांप्रमाणेच होत्या. रुडयार्ड किपलिंग यांनी या सत्यघटनेवर आधारित या भारतीय मोगलीची कहाणी असलेलं पुस्तक लिहिलं. या पुस्तकाचं नाव आहे ‘द जंगल बुक’. या जंगल बुक नावाच्या पुस्तकाच्या कहाणीवरून वॉल्ट डिस्नेने नंतर कार्टून सिरीज काढली. नंतर या मोगलीची कहाणी असलेले चित्रपटसुद्धा काढण्यात आले.

(हेही वाचा – अमरनाथ यात्रेत हेल्मेट सक्ती आणि तंबाखू बंदीचा निर्णय)

सन १९८९ शिकऱ्यांच्या एका समूहाला एक सहा वर्षांचा मुलगा गुहेमध्ये असलेला सापडला. त्याचं नाव ‘दीना सनीचर’ असं ठेवण्यात आलं. हा मुलगा लांडग्यांप्रमाणेच हालचाली करत होता. त्याच्या सगळ्या सवयीदेखील लांडग्यांप्रमाणेच होत्या. तो एक माणूस आहे ही गोष्ट तो पूर्णपणे विसरून गेला होता. त्याने बालपणापासून जसे जनावरांना पाहिले होते तसेच तो वागायचा. त्याची बौद्धिक क्षमताही जनावरांप्रमाणेच होती. सनीचरला आग्र्यातील एका अनाथालयात ठेवण्यात आले. पण दुर्दैवाने तो कधीही सुदृढ होऊ शकला नाही आणि शेवटपर्यंत तो बोलुही शकला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.