Mega Idli Factory; एकाच वेळी अनेक इडली बनवण्याची भन्नाट पद्धत; आनंद महिंद्रा यांनीही केले कौतुक

इडलीचं पीठ तयार झाल्यावर भव्य अशा इडलीच्या साच्यात घातल्यावर एकत्र पुष्कळ इडली तयार होतात.

152

दक्षिण भारतीय पदार्थ महाराष्ट्रात भलतेच यशस्वी झाले आहेत. आज ठिकठिकाणी इडली वड्याचे स्टॉल्स आपल्याला सहज दिसतात. मराठी घरांमधेही इडली, मेदू वडे, डोसे यांचा बेत असतो. इडली बनवणारे अनेक लोक प्रसिद्ध देखील आहेत. पारंपरिक पद्धतीने इडली बनवल्या जातात.

आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहोत, त्यात एकाच वेळी अनेक लोकांसाठी इडली बनवल्या जात आहेत. महत्वाचे म्हणजे हा व्हिडिओ प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. तुम्हाला माहितच असेल की, आनंद महिंद्रा बर्‍याचदा त्यांना आवडलेले व्हिडिओज शेअर करत असतात आणि मग ते व्हायरल होतात.

त्यांच्या पोस्ट्स देखील वाचनीय असतात. अनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की एक व्यक्ती मोठ्या प्रमाणात इडली बनवताना दिसत आहे. इडलीचं पीठ तयार झाल्यावर भव्य अशा इडलीच्या साच्यात ते पीठ घालतो आणि एकत्र पुष्कळ इडली तयार होतात.

पाहा हा व्हिडिओ:

आनंद महिंद्रा लिहितात की, ’एकीकडे इडली अम्मा आहे जी एकेक करुन अतिशय कष्ट घेऊन इडली तयार करते आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात इडली तयार करणारे टूल्स आहे, मात्र सर्वात महत्वाचे आहे मानवी स्पर्श, जो पूर्णपने भारतीय आहे. इथे सुद्धा कामातून मोकळा झाल्यावर गाईला इडली भरवून प्रेमाची देवाण घेवाण केली जात आहे.’ खरंतर हा व्हिडिओ पाहताना प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की इडलीची देखील फॅक्टरी असू शकते? मशीनमुळे कामे किती सोपी झाली आहेत नाही का?

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.