-
ऋजुता लुकतुके
मर्सिडिझ कंपनीचा इलेक्ट्रिक गाड्यांचा पोर्टफोलिओ आता विस्तारतोय. इलेक्ट्रिक मोटार आणि बॅटरीसाठी कंपनीने एएमजी कंपनीची मदतही घेतली आहे. आणि त्यानुसार इलेक्ट्रिक गाड्यांवरच संशोधन सुरू केलं आहे. त्यातून तयार झालेल्या व्ही ८ आणि व्ही १२ इंजिनांनंतर आता कंपनीने अगदी सुरुवातीपासून इलेक्ट्रिक कारची गरज लक्षात घेऊन बनवलेली स्वतंत्र कार मर्सिडिझ बेंझ एएमजी जीटी कूप ही आता लाँचसाठी तयार झाली आहे. कंपनीने सध्या तिचा पहिला व्हीडिओ जारी केला आहे. आणि २०२५ च्या मध्यावर ती लाँच होऊ शकेल. ईव्ही म्हणजे पर्यावरणपूरक तसंच ईव्ही म्हणजे अत्याधुनिक, तरुणाईला आकर्षित करणारी असं समीकरणच सध्या तयार झालं आहे. (Mercedes-Benz AMG GT Coupe)
(हेही वाचा- श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरणी Supreme Court कडून मुस्लिम पक्षाला दिलासा नाहीच)
ते पाहता मर्सिडिझ कंपनीची ही कारही ४ दरवाजांची कूप कार असून अत्यंत स्लीक आणि आकर्षक आहे. जर ही कार लोकांमध्ये रुजली तर कंपनी आपली आधीची जीटी ४ ही इलेक्ट्रिक कार रद्द करू शकते. यापूर्वी कंपनीने दहा वर्षांच्या कालखंडात पूर्णपणे इलेक्ट्रिक गाड्यांचं उत्पादन सुरू करण्याचं ठरवलं होतं. त्या दृष्टीनेच त्यांनी एएमजी डॉट ईव्हीमध्ये संशोधनपर गुंतवणूक केली. पण, आता कंपनीने इंधनावर आधारित गाड्याही सुरूच ठेवण्याचं ठरवलंय. (Mercedes-Benz AMG GT Coupe)
Street Anaconda: New AMG GT 63 Coupe 🐍 Rate it 1-10!
📸: @joewauto (IG) pic.twitter.com/tisgB1k7mL
— Mercedes-Benz & Maybach Fans (@mbmaybachfans) September 15, 2024
एमजी कंपनीचं धोरण या आकाराने काहीशा लहान पण, वजनाने हलक्या इलेक्ट्रिक गाड्या बनवण्याचं आहे. त्यादृष्टीनेच त्यांचं संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर या गाड्यांची ताकद मात्र इतरांपेक्षा मोठी असेल. एक उदाहरण म्हणजे मर्सिडिझची एक गाडी फक्त ५२ पाऊंड वजनाची असेल. आणि तीच गाडी ४८० अश्वशक्ती इथकी ताकद किंवा शक्ती निर्माण करू शकेल. तर आणखी एक गाडी ही अगदी १००० अश्वशक्ती इतकी ताकद निर्माण करू शकते. (Mercedes-Benz AMG GT Coupe)
(हेही वाचा- न्यूयॉर्कमध्ये Swaminarayan Temple मध्ये तोडफोड; पंतप्रधानांविरोधात लिहिल्या घोषणा)
ही गाडी शून्य ते ताशी १०० किमींचा पल्ला २.८ सेकंदांत गाठू शकते. या गाडीचा चार्जिंग पोर्ट मागच्या बाजूने आहे. भारतात जी सध्याची एएमजी जीटी ६३ एस ई ही गाडी आहे, ती कंपनी ३.३ कोटी रुपयांना विकत आहे. त्यामुळे नवीन एएमजी कूप गाडी ही जास्त किमतीचीच असेल. (Mercedes-Benz AMG GT Coupe)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community