Mercedes C-Class- वायरलेस चार्जिंगसारख्या अनेक प्रगत वैशिष्ट्यांसह सुसज्ज, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

113

मर्सिडीज बेंझ हा ब्रॅंड जागतिक बाजारात लोकप्रिय आहे. दरम्यान, मर्सिडीज बेंझने भारतात अधिकृतपणे सी क्लास सेडान ही कार लॉंच केली आहे. नवीन सी-क्लास ही कार ३ इंजिन पर्यायांमध्ये लॉंच करण्यात आली आहे. यामध्ये सी २००, सी २०० डी आणि सी ३०० डी यांचा समावेश आहे. कारचे नवे मॉडेल जुन्या कारच्या तुलनेत लांब आणि रूंद आहे.

त्यापैकी सी २०० ला १.५ लिटर पेट्रोल आणि ४ सिलेंडरसह सुज्ज केले आहे. तर सी २०० डी आणि सी ३०० डी या प्रकारांमध्ये कंपनीने 2.0 लिटर डिझेल इंजिन बसवले आहे, तसेच कंपनीने या दोन्ही इंजिनांना 48V क्षमतेच्या इंटिग्रेटेड स्टार्टर जनरेटर तंत्रज्ञानाने जोडले आहे. यासोबत या कारमध्ये स्टॅंडर्ड 9 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.

मर्सिडीज बेंज सी क्लास वैशिष्ट्ये :

कंपनीने 119-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम स्थापित केली आहे. यासोबतच फुल डिजिटल 13.3-इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, बर्मेस्टर साउंड सिस्टिम, ओव्हरसाईज सनरूफ, लेदर अपहोल्स्ट्री, ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.

सी २०० कारची किंमत 55 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे, तर त्याच्या सी २०० डीची किंमत 56 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे आणि 300 डी व्हेरियंटची किंमत 60 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.