मर्चंट नेव्ही ऑफिसारचा पगार आणि जॉब प्रोफाइल
मर्चंट नेव्ही म्हणजे जहाजांच्या व्यावसायिक ताफ्यातील अधिकारी. जे मालवाहू आणि प्रवाशांची वाहतूक जगातील समुद्र आणि महासागरांमधून करतात. नौदलाही देशाच्या सशस्त्र दलांची एक शाखा आहे. मात्र मर्चंट नेव्ही म्हणजे खाजगी मालकीची जहाजे, जी व्यापारासाठी वापरली जातात.
मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक पात्रतेवर आधारित असलेले जॉब प्रोफाइल आहेत. या कामात कॅडेट ते अधिकारी पर्यंत वेगवेगळी पदं आहेत. म्हणूनच मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा पगार दरमहा ₹२५ हजार ते ₹२० लाखांपर्यंत असतो. (merchant navy salary)
सामान्यतः मर्चंट नेव्हीमध्ये सुरुवातीचा पगार वर्षाला ₹४.८० लाख ते ₹६ लाखांपर्यंत असतो. हा पगार महिन्याला साधारणपणे ₹४०,००० ते ₹५०,००० च्या समतुल्य असतो. तर संबंधित कामाचा दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या अनुभवी मर्चंट नेव्ही ऑफिसरसाठी महिन्याला सरासरी ₹१.६४ लाख एवढा असतो.
(हेही वाचा – Durgadi Fort : हिंदूंच्या प्रदीर्घ लढ्याला यश; कल्याणमधील दुर्गाडी हे देवीचे मंदिरच; न्यायालयाचा निर्वाळा)
मर्चंट नेव्हीत असणारे जॉब प्रोफाइल, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि त्यांना मिळणारा पगार पुढीलप्रमाणे असतो :
जी पी रेटिंग
१०वी
दरमहा ₹२५,००० ते ₹६०,०००.
ट्रेनी कॅडेट
१२वी + प्री-सी नॉटिकल डिप्लोमा
दरमहा ₹२५,००० ते
८५,०००.
मेस बॉय
१०वी
दरमहा ₹४०,००० ते ₹६०,०००.
इंजिन रेटिंग
१०वी
दरमहा ₹४०,००० ते ₹६०,०००.
कुक
१०वी
दरमहा ₹४०,००० ते ₹६०,०००.
वेल्डर/मदतनीस
१०वी + ITI
दरमहा ₹५०,००० ते ₹ ८५,०००.
सी-मॅन
१०वी
दरमहा ₹३८,००० ते ₹५५,०००.
इलेक्ट्रिशियन
१०वी + ITI (इलेक्ट्रिशियन ट्रेड)
दरमहा ₹६०,००० ते ₹९०,०००.
डेक कॅडेट
१२वी + प्री-सी नॉटिकल डिप्लोमा दरमहा ₹२५,००० ते ₹८५,०००.
३रा अधिकारी/मर्चंट नेव्ही २रा अधिकारी
२मेट (FG) पात्र प्रमाणपत्र दरमहा ₹१,५०,००० ते ₹३,००,०००.
चीफ अधिकारी
१मेट (FG) पात्र प्रमाणपत्र
दरमहा ४,००,००० ते ६,००,०००.
मर्चंट नेव्ही कॅप्टन
मास्टर (FG) पात्र प्रमाणपत्र दरमहा ₹८,६५,००० ते ₹२०,००,०००. (merchant navy salary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community