पवई येथील एस. एम. शेट्टी महाविद्यालयाच्या सभागृहात ११ मार्चपासून स्त्री-पुरुष समानता, लिंगभेद, मर्दांगी व लैंगिक विविधता समभाव या विषयावर सिने-महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समभाव फिल्म फेस्टिवलचा दुसरा दिवसही उत्साहात साजरा होत आहे.
( हेही वाचा : मावा फेस्टिव्हलमधून पुरुषसत्तेला सणसणीत चपराक! )
ट्रान्सजेंडर डॉक्युमेंटरी
मेटामॉर्फोसिस या ट्रान्सजेंडरवरील डॉक्युमेंटरीने मावाच्या समभाव फिल्म फेस्टिवलची दुसर्या दिवसाची सुरुवात झाली. मेटामॉर्फोसिस ही कहाणी पश्चिम बंगालच्या लहान शहरात राहणार्या सुदेबची आहे. पुरुष म्हणून जन्माला आलेल्या सुदेबला स्त्रीपणाची जाणीव झाली. तिच्या पालकांनी तिला स्वीकारल आहे. पण तिला सामाजिक भिती, लोक काय म्हणतील, कसे वागतील ही धास्ती असतेच. २०१७ मध्ये सुदेबने जेंडर अफर्मेटिव्ह सर्जरी (एसआरएस) केली आणि यशस्वीही झाली. पण तिने लग्न करण्यास नकार दिला. ती कशाप्रकारचं आयुष्य आता जगतेय, सर्जरीमुळे तिच्यात कोणकोणते बदल झाले? असा अनेक भावनांना ही डॉक्युमेंटरी स्पर्श करते. डॉक्युमेंटरी झाल्यानंतर एलजीबीटी कार्यकर्ते झमीर कांबळे ह्यांनी सुदेब आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मुलांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुदेब आणि झमीर कांबळे ह्यांनी दिली.
Join Our WhatsApp Community