-
ऋजुता लुकतुके
मॉरिस गराज ही कंपनी सध्या भारतात विस्ताराच्या प्रयत्नांत आहे. आणि ते करताना कंपनी आपल्या महत्त्वाकांक्षी दोन गाड्या भारतात आणणार आहे. एमजी ग्लॉस्टर गाडीचं फेसलिफ्ट व्हर्जन बाजारात येईल, ज्यात इंजिन जुनचं असेल. पण, आतून आणि बाहेरून गाडीचं रुपडं बदललेलं असेल. तर क्लाऊड ईव्ही ही कंपनीची नवीन इलेक्ट्रिक एसयुव्हीही लोकांसमोर पहिल्यांदा आणली जाईल. दोघांपैकी ग्लॉस्टर ही गाडीची चाचणी भारतीय रस्त्यांवर गेले काही महिने सुरू आहे. त्यामुळे लाँचही जवळ आल्याचं स्पष्ट दिसतंय. (MG Gloster 2025)
(हेही वाचा- शिंदे गटाला धक्का; Sanjay Shirsat यांना सिडको अध्यक्षपदावरून हटवले)
ग्लॉस्टर गाडीच्या इंजिनात कुठलाही बदल झालेला नाही. पण, गाडीचा लुक आतून आणि बाहेरून बदलण्यात आला आहे. अर्थातच, आधीपेक्षा आधुनिक आणि आक्रमक डिझाईनचा कंपनीचा प्रयत्न आहे. गाडीचं पुढचं ग्रिल आणि आकारही आधुनिक आणि तरुणांना आवडेल असा आहे. हेडलाईट आता एलईडी आहेत. आणि त्यांचंही डिझाईन बदललं आहे. समोर आणि मागेही एलईडी दिव्यांची एक माळ हेडलाईट आणि टेललाईटमध्ये मिसळते. गाडीचा बाहेरचा चेहरा हा अनेक चाचण्यांमधून समोर आला आहे. (MG Gloster 2025)
Upcoming Toyota Fortuner Rival Interior Spotted!
MG’s big launch for 2025, the new Gloster Facelift interior spotted. And can you spot changes compared to the current mode? Expected to be showcased at the 2025 Auto Expo, are you excited for the MG Gloster facelift? pic.twitter.com/V4FFeAVB5a
— MotorOctane (@MotorOctane) January 8, 2025
ही गाडी आतून नेमकी कशी आहे याचं दर्शन अजून लोकांना झालेलं नाही. पण, आधुनिक आणि अद्ययावत एसयुव्ही आहे म्हटल्यावर इन्फोटेनमेंट डिस्प्लेसह इतर आधुनिक फिचरही असणार हे नक्की आहे. तुमचा अँड्रॉईड किंवा ॲपल फोनही तुम्ही या यंत्रणेला जोडू शकणार आहात. शिवाय तुमचा फोन चार्ज करण्यासाठी तुम्हाला वायरलेस चार्जिंग किटही मिळणार आहे. गाडीला पॅनोरमिक सनरूफ असेल. आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चालकाला एडीएएस ही यंत्रणाही देण्यात आली आहे. शिवाय पार्किंगसाठी ३६० अंश कोनांतून पाहता येतील असे कॅमेरे पुढे बसवलेले असतील. (MG Gloster 2025)
(हेही वाचा- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीचा हफ्ता कधी मिळणार ? तारिख ठरली …)
बाकी गाडीचं इंजिन जुनंच म्हणजे २.० टर्बो डिझेल आणि पेट्रोलचं असेल. आणि त्यात ८ स्पीड गिअरबॉक्स असेल. हे इंजिन २१३ बीएचपी क्षमतेचं असेल. आणि ४७८ एनएमचा टॉर्क असेल. हीच गाडी पुढे जाऊन इलेक्ट्रिक प्रकारातही कंपनी आणू शकते. या गाडीची सुरुवातीची किंमत तब्बल ७० लाख रुपये असेल असा अंदाज आहे. (MG Gloster 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community