इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करुन मोठा नफा कमवायचा असेल, तर त्यासाठी दीर्घ अवधीची गुंतवणूक गरजेची आहे. यातील कंपाउंडिंगचा फायदा घेऊन अवघ्या 3 वर्षांत पैसे दुप्पट केले जाऊ शकतात.
रिस्क घ्या, नवी संधा साधा
जे लोक जोखीम उचलण्यास सक्षम आहेत, त्यांच्यासाठी मिडकॅप फंड चांगला पर्याय आहे. टाॅप-10 मिडकॅप फंडांनी 34 टक्के परतावा दिला आहे. या फंडांनी दरमहा 10 हजार रुपयांच्या एसआयपीचे 6.80 लाख रुपये बनवले आहे. यातील प्रत्यक्षातील गुंतवणूक 3.6 लाखांचीच होते. याचाच अर्थ 3 वर्षांत पैसे दुप्पट.
फंड निवडताना हे लक्षात ठेवा
जे पीअर्स आणि बेंचमार्कला बुल मार्केटमध्येच नव्हे, तर बीअर मार्केटमध्येही घसरत नाहीत, त्यातच गुंतवणूक ठेवण्याची क्षमता ज्यांच्यात आहे त्यांनीच मिडकॅपमध्ये गुंतवणूक करावी.
( हेही वाचा: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प वादावर राज ठाकरेंचा हल्लाबोल, स्पष्टचं म्हणाले… )
मिडकॅप फंड आहे तरी काय ?
बाजारमुल्याच्यादृष्टीने बाजारात सूचीबद्ध असलेल्या 101 ते 202 यामधील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणा-या फंडांना मिडकॅप म्हणतात. या फंडांना किमान 65 टक्के गुंतवणूक मिडकॅपमध्ये करावी लागते. यात लार्जकॅपच्या तुलनेत जास्त, तर स्माॅलकॅपच्या तुलनेत कमी जोखीम असते.
Join Our WhatsApp Community