- ऋजुता लुकतुके
तुम्ही मिनी कूपर एसई गाडीचे चाहते असाल तर ही बातमी एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचलीही असेल. या गाडीचा पाचव्या पिढीतील नवा अवतार भारतात अवतरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी कंपनीने मूहूर्त शोधलाय तो २४ जुलैचा. त्या दिवसापासून भारतीय रस्त्यावर नवीन आकर्षक रंगांमधील मिनी कूपर एसई २०२४ गाडी धावताना दिसू लागेल. (Mini Cooper SE 2024)
जुन्या गाडीत आधुनिकता आणून कंपनीने नवीन डिझाईन तयार केलं आहेत. त्यात गोल हेडलाईट्स हा कंपनीचा ट्रेडमार्क आहेच. पण, यावेळी ग्रील थोडं अधिक आकर्षक आणि नेटकं आहे. तर गाडीचं बंपर इतकं साधं आणि सोपं ठेवण्यात आलं आहे की, तिथं कसलाही गजबजाट नाही. दोन पारंपरिक हेडलाईट्स आणि मिनी कूपरचा लोगो फक्त ठळकपणे दिसतो, इतकं बंपरचं डिझाईन साधं आहे. (Mini Cooper SE 2024)
Plug in and Play🔌
The 2024 MINI Cooper SE invites you to a world where electrifying performance meets signature MINI charm⚡️
**Special Offer**
Lease from as low as 2.49% or get Credits up to $6,000.
#MINIRichmond #MINICooper #MINISE #MINIElectric pic.twitter.com/TSl5I4VlqN— MINI Richmond (@MINIRichmond) January 26, 2024
(हेही वाचा – विधानसभा निवडणुकीत महायुतीच बहुमत मिळवणार; Ashish Shelar यांचा विश्वास)
कारची चाकं पूर्णपणे बदलली आहेत आणि ही चाकं थोडी रुंद आहेत. गाडीची पाठची बाजू काही प्रमाणात बदलली आहेत. इथं आता टेल लाईट्सचा आकार बदललाय. दोन्ही दिवे एलईडी आहेत. या गाडीचं इंजिन २ लीटरचं पेट्रोल टर्बो इंजिन असेल. आधीच्या तुलनेत नवीन कार थोडी जास्त ताकदवान आहे आणि ० ते १०० किमींचा वेग ही गाडी फक्त ०.१ सेकंदांत गाठू शकते. (Mini Cooper SE 2024)
भारतात या गाडीचं बुकिंग आता सुरू झालं आहे. ४ जणांची आसन क्षमता असलेली २ दरवाजांची ही गाडी ५३ लाखांपासून भारतात सुरू होते. (Mini Cooper SE 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community