मुंबईत पर्यटन पर्वचे आयोजन! देशभरातील विविध संस्कृतींचे घडणार दर्शन

220

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत, ‘पर्यटन पर्व – 2022’ चे आयोजन केले आहे. ‘पर्यटन पर्व’ हा देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर आधारित उपक्रम आहे. पंतप्रधानांनी, स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना 2022 पर्यंत सर्व भारतीयांनी भारतातील किमान 15 पर्यटन स्थळांना भेटी देण्याचे आवाहन केले होते.

मुंबईत पर्यटन पर्व

महाराष्ट्र, गुजरात, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड राज्य तसेच दादरा आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील विविध संस्कृती, कला, हस्तकला आणि पाककृतींचे माहिती देण्यासाठी मुंबईत पर्यटन पर्व आयोजित केले जात आहे. यामुळे मुंबईकरांना या विभागांमधील वारसा आणि संस्कृतीची माहिती मिळेल. माहिती आणि प्रसारण मंत्रालय (केंद्रीय संचार विभाग), संरक्षण, आयुष (AYUSH), वस्त्रोद्योग (हस्तकलाकृती विकास आयुक्त इत्यादी) इतर केंद्रीय मंत्रालये देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय येथे 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या काळात होणाऱ्या कार्यक्रमाची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे…

  • 8 राज्यातील पर्यटन कार्यालयांचे पर्यटन मंडप/ स्टॉल
  • भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत, केंद्रीय संचार विभाग, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे मल्टीमीडिया प्रदर्शन
  • किचन स्टुडियो- मुंबईमधील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट द्वारे ‘पश्चिम-मध्य मिलाफ’ या संकल्पनेवर आधारित स्थानिक खाद्य संस्कृतीचे प्रदर्शन.
  • भारतातील हस्तकलाकृतींचे प्रदर्शन- क्राफ्ट बझार
  • भारतभरातील लोककलांचे सादरीकरण
  • आयुर्वेद @2047 या संकल्पनेवर आधारित आयुष मंत्रालयाचा स्टॉल

    अग्निपथ योजनेचा प्रचार करण्यासाठी भारतीय वायुदलाच्या मुंबईमधील भर्ती कार्यालयाचा स्टॉल

  • छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालय आणि आसपासच्या परिसरातील आकर्षणे याबाबत माहिती सांगण्यासाठी स्थानिक पर्यटक मार्गदर्शकांबरोबर मोफत टूर
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी कला कार्यशाळा आणि स्पर्धा
  • 3 दिवसांचा हा कार्यक्रम सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या वेळेत सर्वसामान्य जनतेसाठी खुला राहील येथे प्रवेश विनामुल्य आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.