वांद्रे पूर्व येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिनांक ८ ते १० एप्रिल २०२२ या कालावधीत मिसळ महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवात विविध प्रकारच्या मिसळचा तुम्हाला आस्वाद घेता येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खवय्ये या महोत्सवात सहभागी होऊ शकतात. तरी सर्वांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.
( हेही वाचा : आंबा खाल्ल्यानंतर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ! नाहीतर… )
मिसळ महोत्सव
पुणेरी, मामलेदार, नादखुळा, राजेशाही, स्पेशल, चवदार, चुलीवरची, मालवणी वडे मिसळ असे विविध स्टॉल याठिकाणी लावण्यात आले आहेत. मिसळ व्यतिरिक्त बर्फाचा गोळा, खायचे पान, आइस्क्रिमचा आस्वादही तुम्ही घेऊ शकता. मिसळच्या एका थाळीची किंमत कमीत कमी १०० रुपये आहे. मिसळची थाळी तर्री, मिसळ पाव, पापड, फरसाण, गोड पदार्थांनी परिपूर्ण अशी आहे. याठिकाणी चुलीवरची मिसळ आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
खवय्यांना नाशिकपासून नगरची, पुण्यापासून कोल्हापूरची, जुन्नर, कल्याण, ठाणे, चाकण, देहू रोड, कराड, सांगली, शिरूर अशा विविध शहरांच्या मिसळच्या चव एकाच छताखाली चाखता येणार आहे.
ठिकाण
इमारत क्र.५ शासकीय वसाहत खेरवाडी पोलिस चौकी बाजूला वांद्रे पूर्व मुंबई ५१
वेळ
- ९/४/२०२२ : सकाळी १०:०० ते रात्री १०:००.
- १०/४/२०२२ : सकाळी १०:०० ते रात्री १०:००