मिस युनिव्हर्स 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 21 वर्षीय हरनाझ संधूने तब्बल दोन दशकांनंतर मिस युनिव्हर्सचा मुकुट आपल्या स्वगृही आणला. हरनाझ संधूचे नाव विजेते म्हणून घोषित होताच, हरनाझ संधूला अश्रू अनावर झाले. ताज जिंकल्यानंतर काही क्षणांत हरनाझने ‘चक दे फट्टे, इंडिया’ म्हटले. या विजयाने हरनाझचे कुटुंबीय आनंदीत झाले तसेच अनेक दिग्गजांनी तिला कौतुकाची थाप दिली.
स्वागताची तयारी
भारताचा मिस युनिव्हर्सचा खिताब मिळवून देणा-या हरनाझ संधूच्या कुटूंबीयांनी आतापासूनच तिच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु केली आहे. चंडीगडची रहिवासी असलेल्या हरनाझच्या आवडत्या पदार्थांपासून ते घर सजावटीपर्यंतची योजना तिच्या घरच्यांनी आतापासूनच आखायला सुरुवात केली आहे.
( हेही वाचा : … तर किराणा दुकानातही मिळणार वाईन! )
हरनाझला आवडतात हे पदार्थ
अस्सल पंजाब दी कुडी असलेल्या हरनाझला तिचे कुटुंबीय पारंपरिक पदार्थच खाऊ घालणार आहे. तिला मक्के दी रोटी आणि सरसो हा साग, हे दोन्ही पदार्थ खूप आवडतात. याच दोन पदार्थांवर हरनाझ घरी आल्यावर मनसोक्त ताव मारणार आहे, असे तिची आई डॉ. रूबी संधू यांनी सांगितले. आपले आवडते पदार्थ खाल्ल्याने इतक्या दिवसांपासून घरापासून लांब असलेल्याची हरनाझच्या मनातील भावना सहजच दूर होईल, शिवाय या दोन्ही पदार्थांनी कॅलरिज वाढण्याचेही टेन्शन नाही, असेही डॉ संधू म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community