लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवर येणार Missed Call अलर्ट!

व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, फेसबुक हे विविध अ‍ॅप्स सामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. जगभरातील लाखो युजर्स दैनंदिन जीवनात या अ‍ॅपचा वापर करतात. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवनवे अपडेट येत असतात.

( हेही वाचा : बेस्ट कामगारांची भोजन व्यवस्था पूर्वीप्रमाणे करा; अन्यथा भाजपने दिला आंदोलनाचा इशारा)

जगभरातील लाखो युजर्स संवाद साधण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप या मेसेजिंग अ‍ॅपचा वापर करतात. अलिकडे व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक नवनवीन फिचर्स आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवे अ‍ॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस लवकरच सादर करणार आहे यामुळे युजर्सला मिस्ड कॉल (Missed Call) ची माहिती मिळेल. यामुळे जेव्हा व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाऊंट युजर्स स्मार्टफोनमध्ये डू नॉट डिस्टर्ब फिचर Activate करतात तेव्हा युजर्सला मिस्ड कॉल अलर्ट मिळण्यास मदत होईल.

Missed Call अलर्ट

WA BetaInfo च्या रिपोर्टनुसार, डू नॉट डिस्टर्ब मोडमुळे व्हॉट्सअ‍ॅप कॉल नोटिफिकेशन येत नाही. परंतु आता कंपनीच्या नव्या फिचरमुळे तुम्हाला अलर्ट मिळणार आहे. हा अलर्ट तुम्हाला कॉल History च्या बाजूला येईल, या फिचरमुळे कॉल आला याचा अलर्ट तुम्हाला मिळेल. यासोबतच व्हॉट्सअ‍ॅप अनेक नव्या फिचरवर काम करत आहे यात undo बटण, Edit बटण , डबल व्हेरिफिकेशन या फिचरचा समावेश आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here