मोबाईल डेटा लवकर संपतोय? लगेच बदला या सेटिंग्ज

107

स्मार्टफोन माध्यमातून आपण आपली दैनंदिन जीवनातील कामे घरबसल्या पूर्ण करतो. वीजेचे बिल, रिचार्ज, ऑनलाइन पेमेंट, शॉपिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला घरबसल्या करता येतात आणि रिकाम्या वेळात आपण स्मार्टफोनवर चित्रपट, गाणी पाहतो, पण यामुळे इंटरनेट डेटा ( Internet data) लवकर संपतो. टेलिकॉम कंपनी दिवसाला किमान १.५ जीबी डेटा देतात परंतु कित्येकदा २४ तास पूर्ण होण्याच्या आधीच डेटा संपलेला असतो. हे डेटाप्लॅन्स प्रचंड महागले आहेत. त्यामुळे मोबाईल वापरताना इंटरनेट डेटा कसा सेव्ह कराल यासंदर्भात आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत…

( हेही वाचा : कोकणात जाणारे प्रवासी विस्टाडोमच्या प्रेमात! )

डेटा सेव्ह करण्यासाठी या आहेत टिप्स

  • मोबाईलमध्ये अ‍ॅप्सचा वापर कमी करा, असेही काही अ‍ॅप्स असतात ज्यामध्ये अनेक जाहिराती येतात यामुळे तुमचा डेटा वाया जातो. त्यामुळे मोबाईल सेटिंग्जमध्ये जाऊन जास्त डेटा युज करणाऱ्या अ‍ॅप्सची माहिती घ्या आणि अनावश्यक अ‍ॅप्स अनइंस्टॉल करा
  • मोबाईलमध्ये दैनंदिन डेटा लिमिट सेव्ह करा. मोबाईल सेटिंग्जमध्ये जाऊन डेटा वापर पर्यायावर इंटरनेट मर्यादा सेट करता येऊ शकते.
  • अ‍ॅप्स अपडेट करण्यासाठी वाय-फायचा वापर करा. यासाठी मोबाईल सेटिंग्जमध्ये ऑटो अपडेट ओव्हर वाय-फाय ओन्ली( Auto update over wifi only) या पर्यायावर टॅप करा. यामुळे तुमचा फोन जेव्हा वायफायला कनेक्ट होईल तेव्हाच अ‍ॅप्स अपडेट होतील.
  • डेटा सेव्हर मोड चालू ठेवा यामुळे तुमचा डेटा सेव्ह होण्यास मदत होईल.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.