अलिकडेच टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथोरिटी ऑफ इंडियाने (TRAI) ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेत देशातील सर्व टेलिकॉम कंपन्यांना २८ दिवसांऐवजी संपूर्ण महिनाभर म्हणजेच ३० किंवा ३१ दिवसांच्या वैधतेसह रिचार्ज प्लॅन करण्याचे आदेश दिले होते. यानुसार आता देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओने (JIO) आपल्या ग्राहकांसाठी एका खास प्लॅनची घोषणा केली आहे.
( हेही वाचा : १०वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ विभागात ३ हजार ६०३ पदांची भरती )
जिओचा नवा प्लॅन
रिलायन्स जिओच्या या नव्या प्लॅनसाठी युजर्सना २५९रुपये खर्च करावे लागणार आहेत. या २५९ रुपयांच्या नव्या प्लॅनमध्ये तुम्हाला रोज १.५जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा, जिओ टीव्ही, जिओ सिनेमा यांचे सबस्क्रिप्शन मिळेल. हा प्रीपेड (Prepaid) असून याचा लाभ तुम्हाला संपूर्ण महिनाभर ( ३० किंवा ३१ दिवस) घेता येणार आहे.
ग्राहकांच्या हिताचा निर्णय
या नव्या प्लॅनमुळे ग्राहकांना एका वर्षात १२ वेळा रिचार्ज करता येणार आहे. यापूर्वी प्लॅनमध्ये २८ दिवस मिळत असताना एका वर्षात नागरिकांना १३ वेळा रिचार्ज करावा लागत असे यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. यामुळेच ट्रायने ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेत टेलिकॉम कंपन्यांना संपूर्ण महिनाभर रिचार्ज प्लॅन देण्याचे आदेश दिले.
Join Our WhatsApp Community