Mobile Tarrif Hike In 2023: फोनवर बोलणे महागणार?; Telecom कंपन्या करणार दरवाढ?

97

नव्या वर्षात तुमचे मोबाईलवर बोलणे, डेटा वापरणे महाग होण्याची शक्यता आहे. टोलिकाॅम कंपन्यांकडून टॅरिफमध्ये वाढ करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. टेलिकाॅम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. त्यामुळे टेलिकाॅम कंपन्यांकडून टॅरिफमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांवर याचा भुर्दंड बसणार आहे.

ब्रोकरेज हाऊस IIFL सिक्युरिटीजने सांगितले की, नजीकच्या काळात 5G शी संबंधित प्रति युजर सरासरी महसूल, उत्पन्न वाढवणे कठीण आहे. त्यामुळे टेलिकाॅम कंपन्यांकडे 4Gचे टॅरिफ वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. या वर्षाच्या मध्यापर्यंत टेलिकाॅम कंपन्यांकडून टॅरिफ वाढवण्यात येण्याची शक्यता असल्याचे IIFL सिक्युरिटीजने म्हटले. पुढील वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या दरम्यान, पुढील वर्षी दरवाढ केल्यास राजकीय आरोप- प्रत्यारोप होण्याची भीती आहे.

कोटकने आपल्या अहवालात सांगितले की, Vodafone, Idea कर्ज फेडण्यासाठी 25 टक्क्यांपर्यंत टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे. त्याशिवाय,Vodafone, Idea ला 2027 पर्यंत कर्जाची परतफेड करायची आहे. त्यामुळे कंपनीकडून टॅरिफची दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

( हेही वाचा: सरकारने जाहीर केली सार्वजनिक सुट्ट्यांची यादी! 2023 मध्ये मिळणार २४ सुट्ट्या पहा संपूर्ण यादी )

10 टक्क्यांपर्यंत मोबाईल टॅरिफ वाढवण्याची शक्यता

याआधी परदेशातील ब्रोकरेज संस्था जेफ्फरीजच्या विश्लेषकांनी टेलिकाॅम कंपन्यांकडून नव्या वर्षात 10 टक्के टॅरिफ वाढवण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओकडून आर्थिक वर्ष 2022-23, 2023-2024 आणि 2024-25 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत 10 टक्क्यांपर्यंत मोबाईल टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.