आपल्या अंध आई-वडिलांना तीर्थयात्रेला घेऊन निघालेल्या श्रावणबाळाची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आपल्या आंधळ्या आई-वडिलांची मनोभावे सेवा करणारा श्रावणबाळ आपल्या पालकांना तीर्थयात्रा करता यावी म्हणून त्यांना कावडमध्ये बसवून घेऊन चालला होता. वाटेमध्ये जंगलात पाणी भरण्यासाठी एका नदीकाठी थांबला असताना त्याच वेळी तिथे शिकार करण्यासाठी आलेल्या दशरथ राजाचा बाण लागून तो देवाघरी गेला. अशी ही श्रावणबाळाची गोष्ट.
पण हल्लीच्या जगात आईवडिलांना एवढा मान देणारी, त्यांची सेवा करणारी मुलं तशी फारच कमी पाहायला मिळतात. पण अगदीच पाहायला मिळत नाही असे अजिबात नाही. हे सिद्ध झालं आहे ते सोशल मीडियावर एका व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे. या व्हिडीओमध्ये आपल्याला दिसतेय की, एक मुलगा आपल्या म्हाताऱ्या आईला कावडमध्ये बसवून यात्रेला निघाला आहे. त्याच्या कावडीच्या एका बाजूला त्याची आई बसली आहे तर दुसऱ्या बाजूला पाण्याच्या घागरी घेतल्या आहेत.
Kanwar Yatra 2023: A youth carries his mother on one shoulder and water of the river Ganga on the other shoulder in Haridwar pic.twitter.com/83vuUxVT83
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) July 4, 2023
(हेही वाचा – जमिनीवर रासायनिक खतांचा होणारा दुष्परिणाम कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्याची गरज : डॉ. मनसुख मांडवीय)
हा व्हिडीओ ANI UP/Uttarakhand ने ट्विटरवर शेअर केला आहे. हा भावनिक व्हिडीओ पाहून लोकांना या सद्गुणी मुलाबद्दल धन्य वाटत आहे. यावर्षी अधिक श्रावण असल्याने महादेवाचे भक्त आनंदात आहेत. महादेवाची पूजाअर्चा अधिक काळ करायला मिळणार आहे. पण आपल्याला माहिती आहे का, उत्तर भारतात श्रावण महिना आधीच सुरू झाला आहे. या महिन्यात महादेवाचे भक्त तीर्थयात्रेला जातात. त्यांच्याकडे कावड यात्रा करण्याची प्रथा असते.
या प्रथेप्रमाणे मुलगा आपल्या म्हाताऱ्या आई-वडिलांना कावडीमध्ये बसवून यात्रेला घेऊन जातो. व्हिडिओमध्ये दिसणारा या मुलाला सगळे कलियुगाचा श्रावणबाळाची उपमा देत आहेत आणि त्याचे सगळीकडे भरभरून कौतुक होत आहे. कलियुगाच्या या श्रावण बाळाच्या व्हिडिओला आतापर्यंत 98.5 हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आहे आहेत. तर 3 हजारपेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community