mohali punjab : पंजाबच्या मोहाली येथील; धार्मिक आणि पर्यटन स्थळे

94
mohali punjab : पंजाबच्या मोहाली येथील; धार्मिक आणि पर्यटन स्थळे

पंजाब इथल्या मोहाली (mohali punjab) शहाराचं अधिकृत नाव साहिबजादा अजितसिंग नगर असं आहे. हे मोहाली जिल्ह्याचं मुख्य शहर आणि राज्यातल्या सहा महानगरपालिकांपैकी एक महत्त्वाचं शहर आहे. या शहराचं नाव गुरू गोविंद सिंग यांचे ज्येष्ठ पुत्र साहिबजादा अजित सिंग यांच्या नावावरुन ठेवण्यात आलं आहे.

पंजाबचं आयटी हब म्हणून मोहाली शहराचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे या शहराचं महत्त्वही वाढलं आहे. मोहाली शहरामध्ये राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी पंजाब सरकारने शहरामध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आणि वेगवेगळे मनोरंजन प्रकल्प राबवणं सुरू केलं आहे. मोहाली आणि चंदीगढ आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी नवीन रस्ते बांधले आहेत. मोहाली (mohali punjab) शहर हे पूर्वी रुपनगर जिल्ह्याचा एक भाग होतं. २००६ साली या शहराला रुपनगर जिल्ह्यापासून वेगळं केलं गेलं.

मोहाली इथली धार्मिक स्थळं
  • गुरुद्वारा अंब साहिब

गुरुद्वारा अंब साहिब हा शीखांचे ७वे गुरू ‘गुरू हर राय’ यांच्या स्मरणार्थ बांधलेला गुरुद्वारा आहे. हा गुरुद्वारा म्हणजे मोहाली इथल्या सेक्टर ६२ मध्ये असलेला एक ऐतिहासिक वास्तू आहे. हा गुरुद्वारा गुरू हर राय यांच्या आपल्या प्रसिद्ध शीख भाई कुरम, लबाना व्यापारी यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. या गुरुद्वाऱ्याचं व्यवस्थापन SGPC अमृतसर यांच्यातर्फे पाहिलं जातं.

  • श्री शिव मंदिर

श्री शिवमंदिर हे महादेवाला समर्पित असलेलं खूप जुनं हिंदू मंदिर आहे.

  • गुरुद्वारा सिंह शहीद

हा गुरुद्वारा सोहाना नावाच्या गावात आहे. हा गुरुद्वारा सेक्टर ७०च्या जवळ निहंग जथेदार म्हणजेच जथेदार बाबा हनुमान सिंह यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ बांधलेला आहे. अँग्लो-शीख युद्धाच्या दरम्यान ब्रिटिश सैन्याविरुद्धच्या लढाईत निहंग जथेदार यांनी ५०० शीखांसह या ठिकाणी हौतात्म्य पत्करले होते.

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी मानसिक दिवाळखोरी दाखविली; Chandrashekhar Bawankule यांचा हल्लाबोल)

मोहालीतली प्रसिद्ध उद्याने
  • निसर्ग उद्यान, फेज ८
  • रोझ गार्डन
  • बोगनविले गार्डन, फेज ४
  • सिल्वी पार्क, फेज १०
  • व्हॅली पार्क, फेज ८
  • एकता पार्क, फेज ७, चावला चौकाजवळ, मोहाली
  • कारगिल पार्क, सेक्टर ७१
  • फाउंटन पार्क, सेक्टर ७०
  • सिटी पार्क, सेक्टर ६७
मार्केट्स आणि इतर ठिकाणे
  • मुख्य बाजारपेठ, फेज – ७, SAS नगर
  • मुख्य बाजारपेठ, फेज – ४, SAS नगर
  • मुख्य बाजारपेठ, फेज – ३, SAS नगर
  • मुख्य बाजारपेठ, फेज – १, SAS नगर
  • मुख्य बाजारपेठ, फेज – ५, SAS नगर
  • मुख्य बाजारपेठ, फेज – १०, SAS नगर

याव्यतिरिक्त पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम,
आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम,
जनता मार्केट ही ठिकाणं प्रसिद्ध आहेत.

मोहालीचे प्रसिद्ध चौक

मोहालीचे (mohali punjab) प्रसिद्ध चौक, हे शहराच्या सर्वोत्तम वैशिष्ट्यांपैकी एक आहेत :

  • वायपीएस चौक
  • डिप्लास्ट चौक
  • विमानतळ चौक

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.