मोमोज हा नवा प्रकार अनेकांना भुरळ घालत आहे. मराठमोठ्या मोकदासारखे दिसणारे पण चवीला अतिशय वेगळे असणार्या मोमोजचा स्वाद तुमच्या जिभेवर तरळत राहतो. मात्र रोजरोज बाहेर खाणं म्हणजे अतिच होईल नै का? पण खवय्यांनो, घरी बाजारासारखे मोमोज बनवणे खूप सोपे झाले आहे. आज आम्ही तुम्हाला सोपी रेसिपी सांगणार आहोत.
ही रेसिपी पाहुन तुम्ही मोमोज सहज बनवू शकता. आम्ही जी रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत ती क्लिष्ट नसून सोपी आहे. ही रेसिपी वापरुन तुम्ही घरच्या घरी मोमोज बनवू शकता. (momos recipe)
(हेही वाचा – कुंभला काहीच अर्थ नाही, कुंभ फालतू आहे; Lalu Prasad Yadav यांनी पुन्हा गरळ ओकली)
मोमोज बनवण्याची पद्धत :
साहित्य :
मैदा – २ कप
मीठ – चवीनुसार
तेल – १ टीस्पून
पाणी – गरजेनुसार
फिलिंग्ससाठी :
कोबी (चिरलेला) – १ कप
गाजर (चिरलेला) – १/२ कप
कांदा (चिरलेला) – १/२ कप
लसूण (चिरलेला) – ४-५ पाकळ्या
आले (चिरलेले) – १ टीस्पून
हिरव्या मिरच्या (चिरलेल्या) – १-२
काळी मिरी पावडर – १/२ टीस्पून
मीठ – चवीनुसार
सोया सॉस – १ टीस्पून
तेल – १ टीस्पून (momos recipe)
(हेही वाचा – chhaava release date : छावा चित्रपटाकडून काय अपेक्षा करावी?)
पद्धत :
पीठ मळून घ्या :
एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ आणि तेल एकत्र करा आणि चांगले मिक्स करा.
थोडे थोडे पाणी घालून पीठ मऊसर तयार करा.
पीठ झाकून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.
फिलिंग्स तयार करा :
एका पॅनमध्ये तेल गरम करा.
लसूण, आले आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.
कांदा, कोबी आणि गाजर घाला आणि चांगले मिसळा.
काळी मिरी पावडर, मीठ आणि सोया सॉस घालून चांगले मिसळा.
फिलिंग्स थंड होऊ द्या.
टीप :- मोमोजमध्ये भरण्याची भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार बनवू शकता, तसेच चिकनची भाजी बनवूनही भरु शकता. (momos recipe)
मोमोज तयार करा :
पिठाचे छोटे गोळे बनवा आणि ते लाटून घ्या.
प्रत्येक बॉलवर १-२ चमचे फिलिंग्स घाला.
घडी करून मोमोज बंद करा.
स्टीमरमध्ये पाणी गरम करा आणि मोमोज १०-१५ मिनिटे वाफवून घ्या.
टीप : हेच मोमोज तुम्ही तेलात तळूनही बनवू शकता
आता चटणी किंवा सोया सॉससोबत गरमा गरम मोमोज सर्व्ह करा. (momos recipe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community