पावसाळा सुरु झाला की वातावरण अतिशय आल्हाददायक होते. आजूबाजूची हिरवळ पाहून मन प्रसन्न होते. मग अशावेळी पावसात भिजत या वातावरणाचा आनंद घेण्याचा मोह काही जणांना आवरता येत नाही. पण असे केल्याने काहीवेळा आजारी पडण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर अनेकदा लोक आजारी पडतात. पावसाळ्यात आपण काय काळजी घ्यायला हवी याविषयीच्या टिप्स…
( हेही वाचा: NH8, NH13; असे क्रमांक राष्ट्रीय महामार्गांना का दिले जातात ? )
पावसाळ्यात घ्यावयाची काळजी
- पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी चेह-यावर सनस्क्रीन नक्की लावा. पावसाळ्यातही उन्हाची किरणे हानिकारक असतात.
घराबाहेर पडताना छत्री किंवा रेनकोट सोबत ठेवा. - फोन किंवा लॅपटाॅप ओले होण्यापासून वाचवण्यासाठी पाॅलिथिन किंवा वाॅटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा.
- पावसाळ्यात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे घालणे टाळा.
- पावसात हलक्या कापडाची पातळ चादर आणि टाॅवेल वापरा, हे कपडे लवकर सुकतात.
- पावसात भिजल्यावर, लवंग, काळी मिरी, आले आणि तुळस यांचा चहा किंवा काढा प्या.