आज संध्याकाळी चंद्र आणि मंगळ पिधान युती! 

ही अनोखी घटना याअगोदर १४ एप्रिल २००७ रोजी घडली होती. हा योग शनिवारी, 17 एप्रिल रोजी तब्बल 21 वर्षांनी येत आहे.

162

शनिवारी, १७ एप्रिल रोजी अवकाशात एक अनोखे दृश्य पाहायला मिळणार आहे. ती खगोलशास्त्रानुसार अत्यंत मोहक आणि विलोभनीय असणार आहे. ती घटना म्हणाले चंद्र आणि मंगळ पिधान युती होय. सायंकाळी ६.४५ ते ७.३० यावेळेत ही अनोखी घटना पाहायला मिळणार आहे.

पिधान म्हणजे काय? 

जेव्हा खगोलीय वस्तू उदारणार्थ ग्रह, तारे हे जेव्हा चंद्राच्या पाठीमागे लपतात आणि पृथ्वीवरून त्या दिसत नाहीत, तेव्हा त्याला पिधान म्हणतात. यावेळी चंद्र आणि मंगळ पिधान युती होणार आहे अर्थात चंद्र मंगळ ग्रहाला काही काळ झाकून टाकणार आहे. सूर्यास्तानंतर लगेच मंगळ ग्रह चंद्राच्या मागून बाहेर पडताना दिसेल. तोवर मात्र तो चंद्राच्या मागे लपलेला असणार आहे. पिधान युती ही एक प्रकारचे ग्रहणच असते. ही पिधान युती आकाशात अनेकदा होत असते. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात व आजूबाजूच्या देशांमध्ये ही खगोलीय घटना पहावयास मिळणार आहे. यावेळेस मंगळ ग्रहाची तेजस्विता ही अधिक असणार आहे.

(हेही वाचा : संचारबंदीत आकाशातून विहार करत फ्लेमिंगोंची हजेरी!)

२१ वर्षांनी आला आहे हा योग!

जसजसा सूर्य मावळतीला जाईल तसतसा त्याचा संधीप्रकाश कमी होत जाईल व ही पिधानयुती आपल्याला अधिक ठळकपणे दिसून येईल. सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर चंद्राची कोर आकाशात दिसेल व सात वाजून १९ मिनिट दरम्यान चंद्राच्या प्रकाशित भागाच्या खालच्या भागातून मंगळ ग्रह बाहेर पडताना दिसेल. हे दृश्य आपल्याला तब्बल दोन तास पाहता येईल. ही अनोखी घटना याअगोदर १४ एप्रिल २००७ रोजी घडली होती. हा योग शनिवारी, 17 एप्रिल रोजी तब्बल 21 वर्षांनी येत आहे. ही खगोलीय घटना टेलिस्कोपमधून तसेच उघड्या डोळ्यांनी देखील पाहता येईल. हे अतिशय अनोखे दृश्य असणार आहे. हे विलोभनीय दृश्य ‘असीमित’च्या https://fb.me/e/WmCdIj2X या फेसबुक पेजवरूनही दर्शकांना Live पाहता येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.