Weight : वजन वाढल्याने पोटाचा घेरही वाढलाय? तर रोज सकाळी करा फक्त ‘ही’ ३ कामे

359

अनेकवेळा ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणे, शरीराची पाहिजेतेवढी हालचाल न केल्याने शरीराचे वजन वाढते तसेच पोटाचा घेरही मोठा होण्यास सुरुवात होते. अशा परिस्थितीत वजन कमी करायचे असल्यास कोणते उपचार घ्यावेत हेच समजत नाही. त्यामुळे तुमची ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला सकाळी करायची काही सोपी कामे सांगणार आहोत, या कामांची सवय लावल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होऊ लागेल.

पुरेशी झोप घ्या

रोज सकाळी लवकर उठणे ही चांगली सवय आहे. जर तुम्ही रात्री उशिरा झोपलात आणि सकाळी लवकर उठलात तर कमी झोपेमुळे तुमचे वजन वाढू लागते, यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास समस्या येऊ लागतात. म्हणूनच रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावली पाहिजे.

(हेही वाचा Love Jihad : ‘ती’ दहशतवादी तारिकाला लव्ह जिहादचे प्रशिक्षण द्यायची; उत्तर प्रदेश पोलिसांनी केला पर्दाफाश )

कोमट पाण्याने करा दिवसाची सुरुवात

रोज सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्याचे सेवन केल्यास पोटाची वाढलेली चरबी घटवण्यास सोपे जाईल. ओव्याचे पाणी, मध आणि लिंबूमिश्रीत पाणी किंवा जिऱ्याचे पाणी पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता.

फायबरने समृद्ध असा नाश्ता करा

पोहे, उपमा, अंड्याचे ऑम्लेट, चिला, साबुदाण्याची खिचडी, दलिया, ओट्स, भरलेले पराठे, फ्रूट सॅलड आणि ज्यूस असा फायबरने परिपूर्ण नाश्ता खाल्ल्यास बराच काळ पोट भरलेले वाटत राहते. यामुळे तुम्ही जास्त जेवणाचे सेवन टाळाल. यासोबतच तुम्ही दिवसभर पुरेश्या उर्जेने समृद्ध व्हाल. येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.