२०२२ मध्ये गुगलवर सर्च करण्यात आलेले ५ प्रश्न कोणते?

179

नववर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस बाकी राहिले आहे. २०२२ हे वर्ष अनेक महत्त्वांच्या घडामोडींसाठी कायम लक्षात राहणार आहे. २०२२ मध्ये इंटरनेटवर नेटकऱ्यांनी कोणत्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला याबाबतची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. २०२२ वर्षात देशभरात इंटरनेटवर विचारले गेलेले टॉप ५ प्रश्न कोणते आहेत माहिती आहेत का? जाणून घेऊयात…

( हेही वाचा : ‘मन की बात’ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सेवा विवेक संस्थेचे विशेष कौतुक )

व्हॅक्सिनेशन सर्टिफिकेट कसे डाऊनलोड करतात? ( How To download Vaccination Certificate)

कोरोनापासून सुरक्षा मिळवण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू करण्यात आले. यानंतर कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यावर नागरिकांना लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना सोबत बाळगणे आवश्यक होते. त्यामुळे हे प्रमाणपत्र कसे डाऊनलोड करावे हा प्रश्न २०२२ मध्ये गुगलला विचारला गेला. २०२२ मध्ये How To download Vaccination Certificate हा प्रश्न गुगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आला आहे.

सरोगसी म्हणजे काय? ( What Is Surrogacy?)

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, नयनतारा यांनी सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला. या बातम्या गुगलवर सर्वाधिक सर्च झाल्या. यामुळेच इंटरनेटवर सरोगसी म्हणजे काय ? हा प्रश्न गुगलवर दुसऱ्या क्रमांवर सर्वाधिक सर्च केला गेला.

मायोसिटीस आजार

दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा रुथ प्रभूला २०२२ मध्ये मायोसिटीस हा आजार झाला. समांथाने चाहत्यांना याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली. त्यानंतर इंटरनेटवर What is myositis या प्रश्न सर्च करण्यात आला.

सब्जा आणि जवसाच्या बिया

२०२२ मध्ये गुगलवर लोकांनी सब्जा आणि जवसाच्या बियांचे फायदे सर्च केले.

आधार व्होटर आयडी लिंक कसे करावे

गुगलवर व्होटर आयडीला आधारला लिंक कसे करावे याबाबत सर्च करण्यात आले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.