Motorola Edge 60 Fusion : मोटोरोलाचा ५,५०० एमएएच बॅटरी आणि ६८ वॅटचा फास्ट चार्जर असलेला फोन

शानदार फिचर पण, तितकाच किफायतशीर असा हा फोन आहे.

58
Motorola Edge 60 Fusion : मोटोरोलाचा ५,५०० एमएएच बॅटरी आणि ६८ वॅटचा फास्ट चार्जर असलेला फोन
Motorola Edge 60 Fusion : मोटोरोलाचा ५,५०० एमएएच बॅटरी आणि ६८ वॅटचा फास्ट चार्जर असलेला फोन
  • ऋजुता लुकतुके

मोटोरोला मोबाईल फोन उत्पादक कंपनीने रेझर फोल्ड सीरिजपासून या बाजारपेठेत मोठी क्रांती घडवून आणली आहे. तेव्हापासून कंपनीच्या प्रत्येक नवीन मॉडेलविषयी ग्राहकांना उत्सुकता असते. आणि कंपनी ग्राहकांच्या कसोटीला खरी उतरतेही. आता कंपनीचा नवीन फोन मोटोरोला एज ६० फ्युजन (Motorola Edge 60 Fusion) फोन बाजारात आला आहे. पूर्वीच्या एज ४० आणि एज ५० या सीरिजना ग्राहकांनी उचलून धरलं होतं. त्यामुळे या सीरिजलाही चांगली सुरुवात मिळेल असा कंपनीचा होरा आहे.

फोनची चौकट ही सिलिकॉन व्हिगान लेदरची (Silicone vegan leather) आणि ॲल्युमिनिअमची (Aluminium) बनलेली आहे. त्यामुळे फोनचा लुक आकर्षक आहे आणि वजनही कमी आहे. शिवाय फोनच्या मागच्या बाजूला आहेत चार कॅमेरे आणि दोन एलईडी फ्लॅश लाईट. ही चौकटही आकर्षक अशीच आहे. या फोनला आयपी६८ प्रमाणपत्र मिळालं आहे. याचा अर्थ हा फोन धूळ, पाणी आणि वातावरणातील इतर गोष्टींपासून सुरक्षित आहे.

(हेही वाचा – Prayagraj मध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; आमिर, शाखरूखसह तिघांना अटक)

या फोनचा डिस्प्ले ६.७ इंचांचा आहे. E आणि पोल्ड थ्री-डी कर्व्ह्ड डिस्प्ले ही फोनची खासियत आहे. तर स्क्रीनवर अगदी हुबेहूब रंग छटा दिसतात असं प्रमाणपत्र पँटॉन संस्थेनं दिलं आहे. अगदी मानवी त्वचेच्या वेगवेगळ्या छटाही इथं हुबेहूब दिसतात, असा कंपनीचा दावा आहे. १.५ के सुपर एचडी रिझ्युलेशनमुळे डिस्प्ले अगदी सुस्पष्ट आहे. १४४ हर्ट्झच्या रिफ्रेश रेटमुळे स्क्रोलिंगही वेगवान आहे.

एसजीएस आय प्रोटेक्शन तंत्रज्जानामुळे अतीवापरानंतरही डोळ्यांना त्या मानाने थकवा जाणवत नाही. अँड्रॉईड १४ या प्रणालीवर हा फोन चालतो. आधीच्या ४० आणि ५० एज फोनमध्ये असलेला मीडियाटेक हा प्रोसेसर कंपनीन परत आणला आहे. १२ जीबी रॅम असलेल्या फोनपर्यंत मीडियाटेक डिमेंसिटी ७४०० हा प्रोसेसर वापरला आहे. फोनमधील कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा आहे. फोन ८ आणि १२ रॅम तसंच १२६ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या फोनचं वैशिष्ट्य ५,५०० एमएएच क्षमतेची बॅटरी हे आहे. फोनबरोबर ६७ वॅट क्षमतेचा फास्ट चार्जरही देण्यात आला आहे. येत्या ९ एप्रिलपासून फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर हा फोन सवलतीच्या दरात २०,९९९ रुपयांपासून सुरू आहे. (Motorola Edge 60 Fusion)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.