ms dhoni net worth : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची संपत्ती किती आहे, माहिती आहे का?

26
ms dhoni net worth : क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीची संपत्ती किती आहे, माहिती आहे का?

महेंद्रसिंग धोनी हा एक भारतीय प्रोफेशनल क्रिकेटपटू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून खेळतो. धोनी हा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू आहे. त्याने भारतीय क्रिकेट संघाचं अतिशय उत्तमरीत्या प्रतिनिधित्व केलं होतं. २००७ ते २०१७ सालापर्यंत मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये आणि २००८ ते २०१४ सालापर्यंत कसोटी क्रिकेट समान्यांमध्ये तो भारतीय संघाचा कर्णधार होता. महेंद्रसिंग धोनीने सर्वाधिक काळासाठी कर्णधारपद भूषवलं आहे. (ms dhoni net worth)

महेंद्रसिंग धोनी हा सर्वांत यशस्वी भारतीय कर्णधार आहे. त्याने २००७ सालच्या ICC वर्ल्ड T-20, २०११ साली क्रिकेट वर्ल्डकप आणि २०१३ साली ICC चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. धोनी हा तीन वेगवेगळ्या लिमिटेड षटकांचे ICC सामने जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. त्याने २०१० आणि २०१६ साली आशिया चषक जिंकणाऱ्या संघांचंही नेतृत्व केलं होतं. तसंच २०१८ साली विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा तो सदस्य होता. (ms dhoni net worth)

(हेही वाचा – Kisan Divas 2024 : शेतकऱ्यांच्‍या परिवर्तनात्‍मक प्रवासाची प्रशंसा)

महेंद्रसिंग धोनीचा जन्म बिहारमधल्या रांची येथे झाला. त्याने बिहारच्या संघासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच त्याने २३ डिसेंबर २००४ साली बांग्लादेशच्या विरुद्ध एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामान्यांमधून भारतीय क्रिकेट संघासाठी पदार्पण केलं. त्यानंतर एक वर्षानंतर श्रीलंकेविरुद्ध त्याने आपला पहिला कसोटी सामना खेळला. त्यानंतर २००७ साली तो एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. महेंद्रसिंग धोनीने २०१४ साली कसोटी क्रिकेट सामान्यांमधून निवृत्ती घेतली. पण तो २०१९ सालापर्यंत लिमिटेड षटकांच्या क्रिकेट समान्यांमध्ये खेळत राहिला. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट समान्यांमध्ये १७,२६६ धावा केल्या आहेत. (ms dhoni net worth)

इंडियन प्रीमियर लीगमध्ये महेंद्रसिंग धोनी हा चेन्नई सुपर किंग्ज या संघाकडून खेळतो. त्याने आपल्या संघाला दहा वेळा अंतिम फेरीपर्यंत पोहोचवलं आणि पाच वेळा (२०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३) जिंकवलं आहे. महेंद्रसिंग धोनी IPL मध्ये पाच हजारांहून अधिक धावा करणाऱ्या मोजक्या फलंदाजांपैकी एक आहे. तसंच पाच हजारांपेक्षा जास्त धावा करणारा तो पहिला यष्टिरक्षक आहे. (ms dhoni net worth)

(हेही वाचा – शासकीय कामे होणार एका क्लिकवर; प्रशासकीय कामकाजात AIचा वापर प्रभावी)

२००८ साली धोनीला भारत सरकारकडून भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यानंतर त्याला २००९ साली भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मश्री पुरस्कार’ आणि २०१८ साली भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मभूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. तसंच महेंद्रसिंग धोनीला भारतीय प्रादेशिक सैन्याच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नल हा मानद रँक देण्यात आला आहे. महेंद्रसिंग धोनी हा जगभरातल्या सर्वांत लोकप्रिय क्रिकेट खेळाडूंपैकी एक आहे. (ms dhoni net worth)

किती आहे धोनीची संपत्ती?

एका रिपोर्टनुसार महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती १००० कोटींपेक्षा जास्त आहे. ब्रँड एंडोर्समेंट आणि क्रिकेट हे धोनीच्या कमाईचे मुख्य स्त्रोत आहेत. महेंद्रसिंग धोनी अजूनही क्रिकेट खेळत आहे. आयपीएलमध्ये क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी त्याला १२ कोटी रुपये मिळतात. तर ब्रँड एंडोर्समेंटसाठी तो करोडो रुपये घेतो. महेंद्रसिंग धोनी हा ड्रीम ११ आणि इतर अनेक कंपन्यांची जाहिरात करतो. याव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीकडे कार आणि बाइक्सचंही सर्वोत्तम कलेक्शन आहे. (ms dhoni net worth)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.