-
ऋजुता लुकतुके
महानगर टेलिफोन निगम अर्थातच एमटीएनएल या सरकारी टेलिफोन कंपनीचे शेअर गेल्या आठवड्यात १८ टक्क्यांच्या वर होते. एकट्या १३ मार्चला हा शेअर ४ टक्क्यांनी वर आला आणि ५१ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभराचा आढावा घेतला तर हा शेअर ५० टक्क्यांनी वर आला आहे. शेअरमधील वाढीची कारणं समजून घेऊया. एकेकाळी एमटीएनएल आणि बीएसएनएल या दोन सरकारी दूरसंचार कंपन्या कर्जाच्या विळख्यात होत्या. त्यामुळे सरकारने निर्गुंतवणुकीचं धोरण अवलंबलं आणि सरकारी कंपन्यांच्या ताब्यात असलेली मालमत्ताही विक्रीसाठी काढली. (MTNL Share Price)
यामुळे एमटीएनएल आणि बीएसएनएल या दोन कंपन्या मिळून सरकारी महसूल हा तब्बल १२,९५४ कोटी रुपयांवर गेला आहे. कंपन्यांची ही एका वर्षातील कमाई आहे. कंपनीच्या काही जागा, इमारती, दूरसंचार टॉवर आणि फायबर नेटवर्कच्या विक्रीतून हे पैसे उभे राहिले आहेत आणि त्याचा परिणाम शेअरवर झाला आहे. (MTNL Share Price)
(हेही वाचा – Jayant Patil शरद पवारांची साथ सोडणार?)
बाकी कंपनीचा तिमाही ताळेबंद बघितला तर तो अजूनही काळजी करायला लावणाराच आहे. डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत एमटीएनएलने ८३६ कोटी रुपयांचा तोटा जाहीर केला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत तोटा ८३९ कोटी रुपये इतका होता. तो फक्त ३ कोटींनी कमी झाला आहे. तर उत्पादन आणि सेवांच्या विक्रीतून होणारा महसूल ११ टक्क्यांनी खाली आला आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये १९२ कोटींवर असलेला महसूल आता १७० कोटी रुपयांवर आला आहे. (MTNL Share Price)
तर कंपनीचा ईबिटा नुकसानही १२५ कोटींवरून १२९ कोटींवर पोहोचलं आहे. एमटीएनएलच्या शेअरवर त्याचा परिणाम झाला असून वार्षिक उच्चांक १०१ रुपयांवरून हा शेअर ५१ रुपयांपर्यत खाली आला आहे. (MTNL Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या जोखमीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी अथवा विक्रीवर कुठलाही सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community