Muhurat Trading Timing & Key Date : असं पार पडलं संवत २०८१ साठीचं मूहूर्ताचं ट्रेडिंग 

Muhurat Trading Timing & Key Date : १ नोव्हेंबरला मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील मूहूर्ताचं ट्रेडिंग पार पडलं 

27
Who Can Benefit From Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगचे फायदे आणि वैशिष्ट्ये 
Who Can Benefit From Muhurat Trading : मूहूर्ताच्या ट्रेडिंगचे फायदे आणि वैशिष्ट्ये 
  • ऋजुता लुकतुके 

भारतात शेअर बाजार गुंतवणूकदारांमध्ये मूहूर्ताचं ट्रेडिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि या समुदायाच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत. यंदाचं मूहूर्ताचं ट्रेडिंग १ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ ते ७ या वेळेत पार पडलं आहे. आणि नेहमीप्रमाणे यंदाही गुंतवणूकदारांचा खरेदीकडे ओढा दिसून आला. विक्रम संवत २०८१ ची ही सुरुवात होती. त्यामुळे परंपरेप्रमाणे चोपडी पूजन आणि संगणकाची पूजा करून दलाल मंडळी, किरकोळ गुंतणूकदार आणि वित्तीय संस्था या ट्रेडिंगमध्ये सहभागी झाल्या होत्या. (Muhurat Trading Timing & Key Date)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स करंडकासाठी भारताला बोलावण्याचे पाकचे प्रयत्न सुरूच )

महत्त्वाचं म्हणजे एका तासाच्या ट्रेडिंगमध्ये बाजारात उपलब्ध एकूण २,९१० शेअरमध्ये खरेदीचा जोर होता. त्यामुळे त्यांच्या किमतीत वाढ दिसून आली. तर ५३५ शेअरची विक्री झाली. आणि ७५ शेअरची किंमत आहे तीच राहिली. निर्देशांकांचा विचार करता राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक आणि मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक यांत .४० टक्क्यांची वाढ झाली. निफ्टी निर्देशांकाने ९९ अंशांच्या वाढीसह २४,३०० च्या वर झेप घेतली आहे. तर सेन्सेक्सनेही ३३५ अंशांच्या वाढीसह ७९,७२४ वर स्थिरावला आहे. (Muhurat Trading Timing & Key Date)

ऑटो कंपन्यांची सुधारलेली कामगिरी त्यामुळे विक्रीचे वाढलेले आकडे आणि सार्वजनिक बँकांवर लोकांचा असलेला भरवसा यामुळे या दोन क्षेत्रातील कंपन्यांकडे गुंतवणूकदारांचा ओढा होता. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, हुंडे मोटर्स आणि बजाज ऑटो या शेअरना मागणी होती. (Muhurat Trading Timing & Key Date)

(हेही वाचा- निवडणुक चिन्ह असलेले MNS चे ‘ते’ कंदील मुंबई महापालिकेने हटवले)

मूहूर्ताच्या ट्रेडिंगनंतर ४ नोव्हेंबरला सोमवारी शेअर बाजार नियमितपणे सुरू होईल. मूहूर्ताच्या ट्रेडिंगच्या वेळा बघूया,

राष्ट्रीय व मुंबई शेअर बाजारातील मूहूर्त ट्रेडिंगच्या वेळा 

१ नोव्हेंबरचं विशेष ट्रेडिंग सत्र

सुरुवातीची वेळ

समाप्तीची वेळ

प्री-ट्रेडिंग सत्र

१७.४५

१८.००

प्रत्यक्ष मूहूर्त ट्रेडिंग

१८.००

१९.००

समाप्तीचं सत्र

१९.००

१९.३०

ब्लॉक डील सत्र

१७.३०

१७.४५

सौद्यांमध्ये बदल करण्याची वेळ

१८.००

१९.३०

 

(हेही वाचा- निवडणुकीतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी मतदारांच्या हाती cVIGIL App नावाचे शस्त्र)

महत्त्वाचं म्हणजे यंदा टी प्लस वन म्हणजे मूहूर्ताच्या वेळी झालेले सौदे एका दिवसात पूर्ण होणार आहेत. त्यांची पूर्तता लगेच शनिवारी होणार आहे. (Muhurat Trading Timing & Key Date)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.