महाराष्ट्रसह देशाला सण-उत्सवांना मोठी पंरपरा लाभली आहे. भारताच्या हिंदू संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून सर्व धार्मिक विधी, सण-उत्सव मोठ्या हौशेनं आणि उत्साहाने साजरे होताना दिसतात. मात्र आपण पारंपारिक सणांचे दिवस काहिसे विसरत चाललो आहोत असे सध्याचे चित्र दिसतेय. तर दुसरीकडे २१ व्या शतकातील तरूणाईवर ‘पाश्चिमात्य डेज’नी भुरळ घातल्याचे बघायला मिळत आहे. देशातील पारंपारिक संस्कृती न जपता तरूणाई आता पाश्चिमात्य सण-उत्सव आणि डेज साजरे करून आपलं स्टेटस जपण्याची धडपड करत आहे. यासाठी तरूणाई आकर्षक, लक्षवेधी वस्तूंसह महागड्या वस्तू खरेदी करत आहेत. यामुळे भारतीय बाजारपेठेवर पाश्चिमात्य डेजनी कब्जाच केल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठेची जणू मल्टिनॅशनल मंडईच झाली आहे.
आपल्या पारंपारिक सण-उत्सवांना विसरून आजची तरूणाई समोरच्यावर प्रभाव पाडण्याच्या नादात भारतातील हिंदु सण विसरून जात आहेत. मात्र पाश्चिमात्य सणांसह असे काही दिवस साजरे करण्यासाठी दिखाव्याच्या भपक्यावर होणारा खर्च, सोशल मीडियावर चमकण्यासाठी सुरू असलेल्या धडपडीमुळे तरूण मंडळीचा मोठा खर्च होत असून हेच पाश्चिमात्य डेज भारतीयांचे खिसे कापत आहेत. उदाहरण सांगायचे झाले तर फेब्रुवारी महिन्यात येणारा प्रेमाचा सप्ताह म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन वीक’. तरुणाईसाठी फेब्रुवारी महिना खूप स्पेशल असतो. 7 फेब्रुवारीपासून ‘व्हॅलेंटाईन वीक’ सुरू झाला असून हा आठवडा प्रेमी युगुल आपले प्रेम व्यक्त करत असतात. वर्षभर प्रेमी युगुल या आठवड्याची आतुरतेने वाट बघततात. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी या पाश्चिमात्य डेजची आवश्यकता का? तुम्ही तुमच्या जोडीदारावर असेलेलं प्रेम कोणत्याही दिवशी व्यक्त करू शकतात.
फेब्रुवारीत असा होतो ‘व्हॅलेंटाईन वीक’ साजरा
- पहिला दिवस – रोज डे (7 फेब्रुवारी) (Rose Day)
- दुसरा दिवस – प्रपोज डे (8 फेब्रुवारी) (Propose Day)
- तिसरा दिवस – चॉकलेट दिवस (9 फेब्रुवारी) (Chocolate Day)
- चौथा दिवस – टेडी डे (10 फेब्रुवारी) (Teddy Day)
- पाचवा दिवस – प्रॉमिस डे (11 फेब्रुवारी) (Promise Day)
- सहावा दिवस – हग डे (12 फेब्रुवारी) (Hug Day)
- सातवा दिवस – किस डे (13 फेब्रुवारी) (Kiss Day)
- आठवा दिवस – व्हॅलेंटाईन डे (14 फेब्रुवारी) (Valentine Day)
तरूणाईवर्गातील प्रेमी युगुलांमध्ये हे सर्व डेज साजरा करण्यासाठी मोठी चंगळ असते. यापैकी चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे आणि टेडी डे या दिवसांकरता प्रेयसी किंवा प्रियकर आपल्या जोडीदाराला आकर्षक भेटवस्तू देण्यासाठी खूप पैसे खर्च करताना दिसतात. या भेटवस्तूमध्ये कॅडबरी, नेस्ले कंपनीचे महागडे चॉकलेट मोठ्या प्रमाणात खरेदी होतांना दिसतात. खरंतर व्हॅलेंटाइन डे सारखे पाश्चिमात्य डे साजरे करण्याची भारतीय संस्कृती नाही. मात्र 1992 नंतर मल्टीनॅशनल कंपन्यांचे जाळे वाढल्याने अशा डेजचे स्तोम सर्वाधिक केले गेले. मल्टी नॅशनल कंपन्यांचा ट्रेंड आणि आर्चिसच्या दुकानांमधील आकर्षित भेटवस्तू याची भुरळ बॉलिवूडला पडली आणि परिणामी व्हॅलेंटाइन डे निमित्त मुलींना इंम्प्रेस करण्याच्या कथा चित्रपटांतून दाखवल्या जाऊ लागल्याने व्हॅलेंटाइन डे सर्वश्रुत झाला. त्यामुळे सामान्य तरुणांनी चित्रपटातील कथेचे अनुकरण केले आणि ते वास्तवात आणण्यासाठी खऱ्या आयुष्यात डेजच्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करण्यास सुरूवात केले.
व्हॅलेंटाईन वीकच नाही तर रक्षाबंधन सारख्या सणाला देखील भाऊ आपल्या बहिणीला महागडे चॉकलेट्स, कॅडबरी सेलिब्रेशन देतांना दिसतो, त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृती आणि त्यातील डेज हे भारतीयांचे बजेट बिघडवताय असे म्हटलं तरी अतिश्योक्ती ठरणार नाही.
हे आहेत ते ‘डे’ज ज्यामुळे भारतीयांचे कापले जाताय खिसे
- National womens day (13 फेब्रुवारी)
- International Womens day (8 मार्च)
- World laughter day (1 मे)
- Mothers Day (8 मे)
- International Nurses Day (12 मे)
- International Day of the Family (15 मे)
- Fathers Day (19 जून)
- International friendship day (7 ऑगस्ट)
- Teachers Day (5 सप्टेंबर)
- Rose Day (22 सप्टेंबर)
- International Daughters Day (25 सप्टेंबर)
- Christmas Day (25 डिसेंबर)