भायखळा रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक गौरव, युनेस्कोचा पुरस्कार जाहीर

मुंबईतील जुने आणि गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा रेल्वे स्थानकाची ओळख आहे. या रेल्वे स्थानकाला युनेस्कोने आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार जाहीर केला आहे.

भायखळा रेल्वे स्थानकाचा ऐतिहासिक गौरव 

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक १६९ वर्षे जुने आहे. या स्थानकाचे नवीन रुप पाहून याचे बांधकाम अलिकडच्या काळातीलच आहे की काय, असे वाटते. गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाचे नाव निघते. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचे काम उत्कृष्ट आणि दर्जात्मक केल्याने युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार या स्थानकाला प्राप्त झाला आहे. हे काम ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने केले असून भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्त्वात आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने हे काम झले आहे. रेल्वेमंत्रीअश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. या रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम कोविडच्या काळात हाती घेण्यात आले. विशेष म्हणजे कोविड लॉकडाऊनमध्ये या मुजरांना घरी पाठवण्याऐवजी ४ महिने स्थानकाच्या आवारात ठेवण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here