
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच CSMT हे महाराष्ट्रातलं मुंबई इथे असलेलं एक ऐतिहासिक रेल्वे टर्मिनस आहे. हे रेल्वे टर्मिनस युनेस्को जागतिक वारसा स्थळही आहे. (mumbai csmt railway station)
या टर्मिनसची रचना ब्रिटीश आर्किटेक्चरल इंजिनिअर फ्रेड्रिक विल्यम स्टीव्हन्स याने एक्सेल हेग याच्या डिझाइनवरून एका भव्य इटालियन गॉथिक शैलीमध्ये केली होती. या रेल्वे टर्मिनसचं बांधकाम १८७८ साली जुन्या बोरी बंदर रेल्वे स्थानकाच्या दक्षिणेला सुरू झालं. काही वर्षांनी १८८७ साली राणी व्हिक्टोरियाच्या राजवटीला ५० वर्ष पूर्ण झाली होती. त्यानिमित्ताने हे टर्मिनस बांधून पूर्ण करण्यात आलं. (mumbai csmt railway station)
(हेही वाचा – वक्फ कायदाविरोधातील मुसलमानांच्या आंदोलनावर Supreme Court ने व्यक्त केली चिंता; म्हणाले…)
मार्च १९९६ साली या टर्मिनसचं नाव अधिकृतपणे “व्हिक्टोरिया टर्मिनस” ऐवजी “छत्रपती शिवाजी टर्मिनस” असं बदलण्यात आलं होतं. त्यानंतर २०१७ साली या स्थानकाचं नाव पुन्हा बदलून “छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस” असं करण्यात आलं. या स्थानकाची ‘सीएसटी’ ही पूर्वीची आद्याक्षरं बदलून आता ‘सीएसएमटी’ अशी आद्याक्षरं सामान्यतः वापरली जातात. (mumbai csmt railway station)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे भारताच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय आहे. हे भारतातल्या सर्वांत व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक स्थानक आहे. हे टर्मिनस एकूण १८ प्लॅटफॉर्म असलेल्या लांब पल्ल्याच्या आणि उपनगरीय रेल्वे गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून काम करतं. (mumbai csmt railway station)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा इतिहास
या स्थानकाचं नाव अनेक वेळा बदलण्यात आलं आहे. १८५३ ते १८८८ सालापर्यंत ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचं टर्मिनस असलेल्या ‘बोरी बंदर’ स्थानकाच्या जागी हे स्थानक बांधण्यात आलं आहे. राणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त या स्थानाकाचं आधीचं नाव बदलून व्हिक्टोरिया टर्मिनस असं ठेवण्यात आलं. त्यानंतर १९९६ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ या स्थानकाचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनस असं ठेवण्यात आलं. (mumbai csmt railway station)
(हेही वाचा – BMC : केवळ दोन टक्क्यांसाठी मुदतठेवीत पैसे कसे ठेवायचे? आयुक्तांनी उपस्थित केला सवाल)
त्यानंतर पुन्हा डिसेंबर २०१६ साली माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना, विधानसभेमध्ये हे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्याचा ठराव मंजूर केला गेला. त्यानंतर पुढच्याच वर्षी मे २०१७ साली केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिकृतपणे राज्य सरकारला नाव बदलण्यासाठी पत्र पाठवलं आणि मग या स्थानकाचं नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ असं ठेवण्यात आलं. (mumbai csmt railway station)
सीएसएमटी या रेल्वे स्थानकावर एकूण १८ प्लॅटफॉर्म आहेत. त्यांपैकी पाहिले ७ प्लॅटफॉर्म उपनगरीय गाड्यांसाठी आहेत आणि उर्वरित अकरा प्लॅटफॉर्म लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी आहेत. राजधानी, दुरांतो, गरीब रथ आणि तेजस एक्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक १८ वरून सुटतात. याव्यतिरिक्त १६ एप्रिल २०१३ साली सीएसएमटी इथे वातानुकूलित वसतिगृहांचं उद्घाटन करण्यात आलं होतं. या सुविधेमध्ये पुरुषांसाठी ५८ बेड आणि महिलांसाठी २० बेड सामील आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या रेल्वे स्थानकावर स्लमडॉग मिलियनेअर चित्रपटातलं “जय हो” हे गाणं आणि ‘रा.वन’ या चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं होतं. (mumbai csmt railway station)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community