मुंबईच्या डबेवाल्यांना लागले पंढरीच्या वारीचे वेध; ११ जुलैला जाणार रजेवर

पंढरीच्या वारीचे वेध मुंबईच्या डबेवाल्यांनाही लागले आहेत. या वारीमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी एक दिवसाची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत सोमवारी ११ जुलै रोजी डबेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. शनिवार ९ जुलै रोजी डबेवाले पंढपूरला रवाना होतील.

( हेही वाचा : सिंधुदुर्ग जिल्ह्यात NDRF टीम दाखल!)

दोन वर्षांनी होणार पांडुरंगाचे दर्शन

दर्शन घेऊन परतल्यावर मंगळवार १२ तारखेपासून डबेवाले पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

( हेही वाचा : बेस्ट उपक्रमाचे वीजग्राहकांना आवाहन! बनावट SMS पासून सतर्क रहा)

गेली दोन वर्ष पंढरपूर वारी कोरोनामुळे झाली नव्हती. त्यामुळे दोन वर्ष डबेवाल्यांना पंढरपूरला जाता आले नव्हते. पण या वर्षी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे वारीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे दोन वर्षांनी पांडुरंगाचे दर्शन होणार आहे याचा डबेवाल्यांना आनंद आहे. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोल माफी दिल्याने डबेवाल्यांनी समाधान व्यक्त केले असून त्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here