मुंबई दर्शन ही एक दिवसाची मुंबई शहराची धावती टूर आहे, असं म्हणायला हरकत नाही. या टूरमध्ये मुंबई शहरातल्या सुमारे ६० पर्यटन स्थळांना भेट देता येते. त्यांपैकी १४ प्रेक्षणीय स्थळांचा समावेश आहे आणि उर्वरित स्थळं ड्राईव्ह-पास्ट स्पॉट्स आहेत. मुंबई दर्शन टूर एसी बसेसमधून करता येते. या टूर संबंधित ठिकाणांच्या इतिहासाची ओळख करून देण्यासाठी बसमध्ये प्रोफेशनली ट्रेंड लायसेन्स असलेले गाईड्स असतात.
मुंबई दर्शन टूरचे पॅकेजेस खिशाला परवडणारे आहेत. ही टूर मुंबई शहराची ओळख करून घेण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सध्या ही टूर फक्त शनिवार आणि रविवार या दिवशीच सुरू असते. तुम्ही तुमच्या पिकअप पॉईंटनुसार मुंबई दर्शनसाठी MTDC ने ऑफर केलेल्या २ टूरपैकी कोणतीही एक निवडू शकता. (mumbai darshan bus)
(हेही वाचा – Sudhir Mungantiwar मंत्रिमंडळात का नाही ? Devendra Fadnavis म्हणाले …)
मुंबई दर्शन टूर
मुंबई दर्शन टूर सकाळी ९:०० वाजता सुरू होते आणि संध्याकाळी ६:०० वाजता संपते. तुम्ही MTDC च्या अधिकृत वेबसाइट किंवा कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीकडून बुकिंग करू शकता. एसी बसेससोबत असणारे गाईड्स उत्तम प्रशिक्षित असतात. ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी या तीनही भाषांतून बोलतात. जेणेकरून सर्व लोकांना (विदेशी नागरिकांसह) त्यांनी सांगितलेलं स्थळांचं वर्णन नीट समजू शकेल. MTDC च्या पॅकेजमध्ये जेवणाचा समावेश नाही. तसंच पर्यटकांना कोणतंही अधिकृत माहितीपत्रक दिलेलं नसतं. (mumbai darshan bus)
- मुंबई दर्शन टूर १ – CST ते दक्षिण मुंबई ते CST
सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी बस टर्मिनस येथून पर्यटकांना घेऊन या टूरला सुरुवात होते. त्यानंतर बस वेगवेगळ्या पर्यटन स्थळांकडे जाते. सोबत असलेला गाईड तुम्हाला काही ठिकाणं दूरवरूनच दाखवतो आणि काही ठिकाणांना तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता.
- मुंबई दर्शन टूर २ – दादर ते दक्षिण मुंबई ते दादर
सकाळी ९.०० वाजता दादर पूर्व इथल्या MTDC च्या काउंटरवरून पर्यटकांना घेऊन या सहलीला सुरुवात होते. त्यानंतर बस वेगवेगळ्या पर्यटन स्थळांकडे जाते. सोबत असलेला गाईड तुम्हाला काही ठिकाणं दूरवरूनच दाखवतो आणि काही ठिकाणांना तुम्ही प्रत्यक्ष भेट देऊ शकता. (mumbai darshan bus)
(हेही वाचा – मशिदीत ‘जय श्री राम’ च्या घोषणा देणे गुन्हा कसा ? Supreme Court चा कर्नाटक सरकारला सवाल)
मुंबई दर्शन टूरमध्ये समाविष्ट असलेल्या ठिकाणांची नावं..
- गेटवे ऑफ इंडिया
- सिद्धिविनायक मंदिर
- वांद्रे बँडस्टँड
- मणिभवन
- हँगिंग गार्डन
- ताजमहाल हॉटेल
- नेहरू सायन्स सेंटर
- नेहरू तारांगण
- गिरगाव चौपाटी
- तारापोरवाला मत्स्यालय
- महालक्ष्मी रेसकोर्स
- भाऊ दाजी लाड संग्रहालय, धोबीघाट
- वांद्रे-वरळी सी लिंक
- छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय
या ठिकाणांव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या बसमधून प्रवास करताना इतर अनेक स्थळं पाहू शकता. (mumbai darshan bus)
- मुंबई दर्शन टूर पॅकेजेस
एमटीडीसीकडून मुंबई दर्शनसाठी तीन श्रेणीतली पॅकेजेस उपलब्ध आहेत.
(हेही वाचा – Noise Pollution: मुंबईत हॉर्नचा सर्वाधिक आवाज ‘या’ भागातून)
- भारतीय नागरिकांसाठी गोल्ड पॅकेज प्रवेश शुल्क-
प्रौढांसाठी ₹९६८
मुलांसाठी ₹८७४.
- परदेशी नागरिकांसाठी गोल्ड पॅकेज प्रवेश शुल्क – (ज्यामध्ये NRI, PIO आणि OCI समाविष्ट आहे).
प्रौढांसाठी ₹१८१२
मुलांसाठी ₹८७४.
- सिल्व्हर पॅकेज सर्वांसाठी –
₹६९१.
काही कारणास्तव तुम्हाला मुंबई दर्शन टूरसाठी तुमचं बुकिंग रद्द करावं लागल्यास, ते रद्द करताना टूरसाठी किती दिवस शिल्लक आहेत यानुसार शुल्कामध्ये कपात केली जाईल.
- टूरच्या १५ दिवस आधी बुकिंग रद्द केल्यास प्रवेश शुल्क ५% वजावट करून परत मिळेल.
- ८ ते १४व्या दिवसापूर्वी बुकिंग रद्द केल्यास प्रवेश शुल्क २५% वजावट करून परत मिळेल.
- टूरच्या ४ ते ७व्या दिवसापूर्वी बुकिंग रद्द केल्यास प्रवेश शुल्क ५०% वजावट करून परत मिळेल.
- मुंबई दर्शन टूरची बुकिंग ४ दिवसांपेक्षा कमी कालावधी असताना रद्द केली तर कोणताही परतावा दिला जाणार नाही.
बुकिंगसाठी संपर्क क्रमांक
दूरध्वनी क्रमांक : ०२२-२२८४५६७८ – एमटीडीसी आरक्षण केंद्र, मुंबई. (mumbai darshan bus)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community