मुंबईत घर घेताय? मग हे नक्की वाचा… कदाचित विचार बदलेल

102

रोटी, कपडा और मकान या माणसाच्या बेसिक नीड्स आहेत. सध्या मकान खरेदी करणं या साध्या विचाराने सुद्धा आपण कानावर हात ठेवत असू. कारण जागांचे गगनाला भिडलेले भाव हे आपल्याला आपली जमिनीवरची जागा दाखवून देतात. त्यात मुंबईसारख्या ठिकाणी घर असणं म्हणजे इहलोकात राहून स्वर्गलोकीचं सुख अनुभवण्यासारखं आहे, असं आपल्याला वाटतं.

पण घर खरेदी करण्यासाठी मुंबई हे सगळ्यात कमी आनंदी शहर आहे, असं जर सांगितलं तर हे स्वप्न बघणा-यांना आणि प्रत्यक्ष हे स्वर्ग सुख उपभोगणा-या अनेकांना त्यांच्या आनंदावर विरजण घातल्यासारखं झालं असेल. पण नुकत्याच हाती आलेल्या एका सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.

(हेही वाचाः भारतात इंधन ‘पेटले’, म्हणून भारतीय ‘या’ देशात पळत ‘सुटले’! मिळतंय स्वस्त इंधन)

असे करण्यात आले सर्वेक्षण

ऑनलाईन मॉर्टगेज अ‍ॅडव्हायझर नावाच्या यूके फर्मने केलेल्या विश्लेषणातून घर खरेदी करण्यासाठी ‘सर्वात आनंदी’ आणि ‘कमीत-कमी आनंदी’ ठिकाणांची यादी तयार करण्यात आली आहे. घर खरेदी केल्यावर इन्स्टाग्राम युजर्सच्या चेह-यावर असलेल्या समाधानाची पातळीवरुन ही यादी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार जगातील विविध शहरांना गुण देण्यात आले. हे गुण निश्चित करण्यासाठी मायक्रोसॉफ्ट अ‍ॅझ्यूरचा वापर करण्यात आला, जे फोटोमधील लोकांच्या चेहऱ्यावरील भावनांचे विश्लेषण करते आणि विविध भावनांच्या तीव्रतेवर आधारित आपोआप गुण निश्चित करते.

ही आहेत जगातील कमी आनंदी शहरं

या अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की घर खरेदी करण्यासाठी मुंबई हे जगातील सर्वात कमी आनंदी शहर आहे. मुंबईत घर खरेदी करणा-याच्या आनंदाचे सरासरी गुण 100 पैकी 68.4 होते. हे गुण जागतिक घर खरेदी करणाऱ्या सरासरीपेक्षा 17.1 टक्के कमी आहेत. घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात कमी आनंदी शहरांच्या यादीत अमेरिकेतील अटलांटा आणि ऑस्ट्रेलियातील सिडनी अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

(हेही वाचाः मुंबईत कोविड रुग्णांचा आकडा झाला ‘ट्रिपल थ्री’)

भारतातील सर्वात आनंदी शहरे कोणती?

घर खरेदी करण्यासाठी भारतातील सर्वात आनंदी शहर चंदीगढ आहे, जे जागतिक यादीत पाचव्या क्रमांकावर आले. अव्वल 20 शहरांच्या यादीत स्थान मिळविणारी भारतातील इतर शहरेसुद्धा आहेत. त्यात दहाव्या स्थानावर जयपूर, 13व्या स्थानावर चेन्नई आणि 17व्या आणि 20व्या स्थानावर अनुक्रमे इंदौर आणि लखनऊ ही शहरे आहेत.

ही आहेत जगातील आनंदी शहरं

या पद्धतीचा वापर करुन केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, घर खरेदी करण्यासाठी जगातील सर्वात आनंदी शहर हे स्पेनमधील बार्सिलोना आहे. त्यानंतर इटलीतील फ्लोरेंस आणि दक्षिण कोरियामधील उल्सान दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. बार्सिलोनाच्या घर खरेदीदारांच्या फोटोंचा अभ्यास केला असता, त्यांना 100 पैकी सरासरी 95.4 गुण मिळाले. हे गुण घर खरेदीदारांच्या जागतिक सरासरी आनंदाच्या पातळीपेक्षा 15.6 टक्के जास्त आहेत.

(हेही वाचाः शिवाजी पार्क झळकले)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.