यंदा गणेशमूर्तींना उंचीचे बंधन नसल्याने अनेक मंडळांनी उंच मूर्त्यांची स्थापना केली आहे. यामध्ये खेतवाडीच्या ११ व्या गल्लीतील मुंबईच्या महाराजाच्या उंचीची वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाली आहे. परशुराम रूपी असणाऱ्या ३८ फुटी महाराजाने मुंबईतील नव्हेच तर राज्यातील गणेशमूर्तींच्या उंचीचे विक्रम मोडले आहेत.
( हेही वाचा : कोकणातील चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू; गाड्या फुल्लं महामार्गावर अभूतपूर्व कोंडी)
वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये दखल
कोरोना काळात अनेक निर्बंध होते परंतु आता दोन वर्षांनी राज्यभरात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा मूर्तीच्या उंचीसाठी कोणत्याही प्रकारची अट ठेवण्यात आलेली नव्हती. सर्व मंडळांमध्ये सर्वात उंच बाप्पा म्हणून गिरगाव खेतवाडीच्या ११ व्या गल्लीतील मुंबईचा महाराजा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली असून त्यांचे विशेष प्रतिनिधी संजय नार्वेकर तसेच एचओडी सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते मंडळाला प्रमाणपत्र देण्यात आले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एवढ्या उंचीची मूर्ती बनवण्यात आल्याची माहिती संजय नार्वेकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community