आता दिव्यांगांना इलेक्ट्रीक बाईकने व्यवसाय करता येणार

128

मुंबईतील दिव्यांगांना आजवर दिल्या जाणाऱ्या तीन चाकी सायकलऐवजी आता इलेक्ट्रीक बाईकचे वाटप करण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक नगरसेवक प्रभागांमधून दोन याप्रमाणे एकूण ५५४ दिव्यांगांची इलेक्ट्रीक बाईकसाठी निवड करण्यात येणार असून, प्रत्येक बाईकच्या खरेदीसाठी सुमारे ४० हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे या बाईक्सवरून दिव्यांगांना केवळ फिरताच येणार नाही, तर त्यांना त्यावरून व्यावसायही करता येईल अशाप्रकारची रचना या बाईकमध्ये असेल.

म्हणून दिल्या जाणार ई-बाईक 

मुंबई महापालिकेच्या नियोजन विभागाच्यावतीने महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. तसेच दिव्यांगांनाही झेरॉक्स मशीन देत स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवताना त्यांना तीन चाकी वाहनेही उपलब्ध करून दिली जाणार आहेत. झेरॉक्स मशीनसाठी २५३ दिव्यांगांचे अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते. त्यामुळे आजवर दिव्यांगांना तीन चाकी बाईक्स दिल्या जात होत्या. आता इलेक्ट्रीक बाईक उपलब्ध करून दिले जाणार आहे. पर्यावरणाचा विचार करता, तसेच पेट्रोलचे वाढते दर लक्षात घेता दिव्यांगांसाठी ई-बाईक खरेदी करण्यात येत आहे.

ई-बाईक्सची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये

मुंबईतील तब्बल ५५४ दिव्यांगांना इलेक्ट्रीक बाईक्स दिल्या जाणार आहेत. मुंबईतील ७ नगरसेवकांच्या प्रभागांमध्ये प्रत्येकी दोन याप्रमाणे दिव्यांगांची निवड केली जाणार आहे. त्यांना ही इलेक्ट्रीक बाईक केवळ चालवण्ण्यासाठी नसून, त्याच्या मागील बाजूस एक बॉक्स उपलब्ध करून दिला आहे. ज्यामध्ये त्यांना काही वस्तू विक्री करता येणार आहे. या वस्तूंच्या विक्रीतून त्यांची आर्थिक कमाई होईल. याकरता प्रशासनाच्यावतीने ३९ हजार ९०० रुपयांची रक्कम खर्च केली जाणार आहे. दिव्यांगांच्या कागदपत्रांची पुतर्ता झाल्यानंतर, ते ज्या दुकानांमधून इलेक्ट्रीक बाईक खरेदी करणार आहेत, त्या दुकानदारांचे पैसे महापालिकेच्यावतीने अदा केले जाणार आहेत. यासंदर्भात महापालिका सहायक आयुक्त किरण  दिघावकर (नियोजन) यांच्याशी संपर्क साधला असता, अशाप्रकारे दिव्यांगांना इलेक्ट्रीक बाईक देण्याचा प्रस्ताव आहे. या बाईकच्या मागील बाजुस कंटेनरची सुविधा आहे. ज्याद्वारे दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळवता येईल या बाईकच्या माध्यमातून वस्तू विक्रीही करता येईल,अशाप्रकारची रचना करण्यात येणार आहे. जेणेकरून त्या वस्तूच्या विक्रीतून दिव्यांगांना चार  पैसे कमवता येईल,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पर्यावरणाचा विचार करून,या ई-बाईक खरेदी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये महापालिकेच्यावतीने ४० हजारांपर्यंतची रक्कम दिली जाणार आहे.

 (हेही वाचा :धक्कादायक! भारत धूम्रपानात जगात दुसऱ्या स्थानी! )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.