यंदाची दिवाळी फटाके फोडूनही ध्वनी प्रदूषण विरहित होणार आहे. आश्चर्य वाटले ना! कसे काय, म्हणून प्रश्नही पडला असेल! पण हे स्वतः सरकारने सिद्ध केले आहे. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि ‘आवाज’ फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे फटाक्यांची चाचणी केली. ते वाजतात का म्हणून नाही, तर किती आवाजात वाजतात हे तपासण्यासाठी केली. त्यात ३० प्रकारच्या फटाक्यांमध्ये केवळ २ फटाक्यांनीच वाढीव आवाज केला, पण उर्वरित २८ प्रकारचे फटाके यात ‘पास’ झाले आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी धुम’धडाक्यात’ साजरी करता येणार आहे.
पुढच्या वर्षी वायू प्रदूषणाची चाचणी होणार
या चाचणीत ७ प्रकारच्या फटाक्यांमध्ये रासायनिक घटक आढळून आले नाही, त्या फटाक्यांवर तसे नमूद करण्यात आले होते की, या फटाक्यांमुळे वायू प्रदूषण होणार नाही. पुढील वर्षांपासून फटाक्यांमुळे वायू प्रदूषण किती होते, याच्याही चाचण्या घेण्याचा विचार तज्ज्ञांचा आहे.
(हेही वाचा : दिवाळीच्या साफसफाईचे काही भन्नाट मीम्स नक्की बघा… हसून वेडे व्हाल)
२००४ साली सर्वच फटाके ध्वनी प्रदूषण करणारे होते
२०१८साली सर्वोच्च न्यायालयाने जे फटाके कमी आवाज करतात आणि कमी वायू प्रदूषण करतात, त्यांनाच परवानगी देण्याचा आदेश दिला होता. नियमानुसार एक फटाखा १२५ डेसिबलपर्यंत आवाज करू शकतो, फटाक्यांची माळ ही ९० डेसिबलपर्यंत आवाज करू शकते. २०१९साली महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ३ प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. त्या फटाक्यांनी १२६ डेसिबल इतका ध्वनी निर्माण केला होता. २००४ सालापासून महाराष्ट्र प्रदूषण मंडळ आणि ‘आवाज’ फाऊंडेशन यांनी संयुक्तपणे फटाक्यांची चाचणी करत आहे. त्या वर्षी १०० टक्के फटाके हे ध्वनी प्रदूषण करणारे होते.
Join Our WhatsApp Community