सध्या अन्नपदार्थांचे स्टॉल्स, हॉटेल्स पुष्कळ प्रमाणात निर्माण झाले आहेत आणि विशेष म्हणजे हा धंदा तेजीत आहे. मुंबई किंवा शहरांमध्ये तर ठिकठिकाणी असे स्टॉल्स आणि हॉटेल्स आपल्याला दिसतात आणि तिथे खवय्यांची गर्दी देखील असते. तसेच ठिकठिकाणी इडली वड्याचे स्टॉल्सही दिसतात.
या दक्षिण भारतीय पदार्थाने भारतीयांच्याच नव्हे तर जगभरातील खवय्यांची भूक मिटवली आहे. स्टॉल्सवर मिळाणारी इडली प्लेट साधारण २० ते ३० रुपयांची असते, त्यामुळे हा पदार्थ खिशाला परवडणारा आहे. इडली हा अनेकांचा आवडता पदार्थ. आपण खातो ती इडली तांदळापासून बनवलेली असते आणि सफेद रंगाची असते. पण आता आम्ही तुम्हाला जो व्हिडिओ दाखवणार आहे, त्यात इडली काळ्या रंगाची आहे.
(हेही वाचा पुतळे, म्युरलसह धार्मिक ठिकाणांच्या साफसफाईसाठी भाजपने उचलले पाऊल)
खरंतर इडली वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते. मात्र सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी एक व्हिडिओ सामायिक केला आहे, ज्यात ते काळी इडली खाताना दिसत आहेत. आशीष विद्यार्थी हे बर्याचदा खाऊचे व्हिडिओ सामायिक करत असतात. हा व्हिडिओ नागपूरचा आणि आणि त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये तिथला पत्ता सुद्धा दिला आहे. जेणेकरुन कुणाला ही काळी इडली खायची असेल तर तिथे जाऊ शकतो.
पाहा आशीष विद्यार्थी यांचा हा व्हिडिओ:
View this post on Instagram
या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आशीष विद्यार्थी म्हणतात, “काळी इडली खायची आहे. अगदी आश्चर्यकारक आहे, मी पहिल्यांदा खाणार आहे आणि तुम्ही सुद्धा कधी पाहिली नसेल याची खात्री आहे मला.” असं म्हणत आशीष विद्यार्थी काळी इडली खातात आणि त्यांना खूप आवडते. सर्वात आधी इडलीमध्ये तूप घालतं जातं आणि त्यावर गन पावडर टाकली जाते तसेच नारळाच्या चटणीबरोबर ही इडली खवय्यांना खायला दिली जाते. तुम्हालाही ही काळी इडली खायची असेल आणि तुम्ही नाशिकमध्ये असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या.
Join Our WhatsApp Community