Murud-Janjira : अबब! मुरुड-जंजिरा किल्ल्यावर होत्या ५७२ तोफा?

35
Murud-Janjira : अबब! मुरुड-जंजिरा किल्ल्यावर होत्या ५७२ तोफा?

मुरुड-जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात मुरुड येथे आहे. स्वराज्याच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी तो जिंकून स्वराज्यात आणला. शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमणापासून वाचण्यासाठी आपलं स्वतःचं सागरी आरमार तयार केलं होतं. (Murud-Janjira)

(हेही वाचा – D Gukesh : टाटा स्टील खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत डी गुकेशची यशस्वी सलामी)

मुरुड-जंजिरा किल्ल्याची प्रमुख वैशिष्ट्ये : 

मुरुड-जंजिरा किल्ला हा पश्चिम भारतीय किनारपट्टीच्या मध्यभागी, मुंबई शहराच्या दक्षिणेला १६५ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. हा किल्ला मुरुड या शहराजवळ अरबी समुद्राच्या किनाऱ्यावरील एका अंडाकृती आकाराच्या बेटावर वसलेला आहे. जंजिरा हा भारतातल्या सर्वात मजबूत सागरी किल्ल्यांपैकी एक आहे. राजापुर जेट्टीवरून या किल्ल्याकडे जलमार्गाने जाता येतं. या किल्ल्याचा मुख्य दरवाजा समुद्र किनाऱ्यावर राजापुरकडे आहे. हा दरवाजा सुमारे ४० फूट अंतरावरून सहज दृष्टीक्षेपात येतो. खुल्या समुद्राकडे जाण्यासाठी किल्ल्याच्या मागे एक छोटा दरवाजा आहे.

या किल्ल्यावर २६ तोफखान्याचे बुरुज अजूनही शाबूत आहेत. बुरुजांवर स्थानिक आणि युरोपियन बनावटीच्या अनेक तोफा आहेत. सध्या काहीश्या भग्नावशेषात असलेला हा किल्ला त्याच्या भरभराटीच्या काळात एक पूर्ण विकसित परिपूर्ण किल्ला होता. या किल्ल्यामध्ये अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने, ६० फूट खोल असलेले दोन लहान गोड्या पाण्याचे तलाव इत्यादी सर्व आवश्यक सुविधा होत्या. (Murud-Janjira)

(हेही वाचा – Guardian Minister : एकनाथ शिंदे यांचा फडणवीसांना फोन… पालकमंत्रिपदाच्या स्थगितीची इनसाईड स्टोरी)

या किल्ल्याचं एक विशेष आकर्षण म्हणजे कलाल बांगडी, चावरी आणि लांडा कसम नावाच्या ३ महाकाय तोफा आहेत. या तोफा त्यांच्या स्फोटासाठी भयानक होत्या असं म्हणतात. पश्चिमेकडचा आणखी एक दरवाजा समुद्राभिमुख आहे. या दरवाज्याला ‘दर्या दरवाजा’ असं म्हणतात. मुरुड-जंजिऱ्याच्या पूर्वेला सुमारे ३२ किलोमीटर एवढ्या अंतरावर घोसाळगड नावाचा आणखी एक किल्ला आहे. हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर आहे. या किल्ल्याचा वापर चौकी म्हणून केला जात होता. सुरुवातीला बेटावरील किल्ल्यावर ५७२ तोफा होत्या.

समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका लहानशा गावातून जंजिरा किल्ल्यावर पर्यटक प्रवेश करू शकतात. लहान होडीतून थोडा प्रवास केल्यानंतर किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश करता येतो. हा किल्ला अंडाकृती आकाराचा आहे. या किल्ल्याची भिंत सुमारे ४० फूट उंच आहे आणि त्यात १९ गोलाकार कमानी आहेत. त्यांपैकी काही कामानींवर अजूनही तोफा बसवलेल्या आहेत. (Murud-Janjira)

(हेही वाचा – Promenade Beach कुठे आहे आणि तिथे गेल्यावर काय मज्जा कराल?)

तोफांमध्ये प्रसिद्ध तोफ कलाल बांगडीचाही समावेश आहे. समुद्र मार्गाने येणाऱ्या शत्रूंना पाणी पाजण्यासाठी या तोफा मोठ्या प्रमाणात वापरल्या जात होत्या. किल्ल्याच्या भिंतींच्या आत राजवाड्याचे आणि ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याने बनवलेल्या स्नानगृहाचे अवशेष आहेत. येथे राज घराण्यातल्या महिला राहत असल्याचे पुरावेही आहेत. हा संपूर्ण किल्ला खाऱ्या पाण्याने वेढलेला असूनही किल्ल्यावर एक खोल विहीर गोड्या पाण्याचा पुरवठा करते. ही विहीर आजसुद्धा त्या ठिकाणी गोड्या पाण्याचा पुरवठा करते आहे. (Murud-Janjira)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.