Muthoot Finance Share Price : सुवर्ण तारण कर्जाचा किती परिणाम मुथूत फायनान्सच्या शेअरवर होणार?

Muthoot Finance Share Price : रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच सुवर्ण तारण कर्ज वितरणात अनेक त्रुटी असल्याचा ठपका बँकेतर वित्तीय संस्थांवर ठेवला होता 

91
Muthoot Finance Share Price : सुवर्ण तारण कर्जाचा किती परिणाम मुथूत फायनान्सच्या शेअरवर होणार?
Muthoot Finance Share Price : सुवर्ण तारण कर्जाचा किती परिणाम मुथूत फायनान्सच्या शेअरवर होणार?
  • ऋजुता लुकतुके 

भारतीय बँकिंग व्यवस्थेत तेव्हा खाजगीकरणाचं वारं नुकतं सुरू झालं होतं. पण, बँकांमध्ये सरकारी बँकांचाच बोलबाला होता. सेवा काहीशी धिमी असली तरी लोकांचा विश्वास होता. आणि या बँका आकाराने मोठ्याही होत्या. या बँका समाजाच्या सर्व थरातील लोकांपर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. एकतर त्या केंद्रीकृत होत्या. आणि दुसरं म्हणजे कर्ज देताना कागदपत्रांची पूर्तता हा खूप मोठा विषय होता. ग्रामीण भागात पुरेसा शाखाही नव्हत्या. आणि अनेकांकडे या बँकांसाठी लागणारी कागदपत्र नसायची. याचा सर्वाधिक फटका छोट्या आणि लघु, मध्यम आकाराचा उद्योग चालवणाऱ्या लोकांना बसत होता. अशा लोकांना कर्ज उपलब्ध व्हावं यासाठी रिझर्व्ह बँकेनं बँकेतर वित्तीय संस्थांचं जाळं उभं करायचं ठरवलं. आणि त्यांना खासकरून त्यांच्या प्रांतांमध्ये छोट्या उद्योजकांना मदत करण्याचं आवाहन केलं. यातून उभ्या राहिल्या बँकेतर वित्तीय संस्था आणि छोट्या आकाराची कर्जं देणाऱ्या संस्था. दक्षिण भारतात अशाच प्रकारचं काम करणारी एक मोठी संस्था म्हणजे मुथूट फायनान्स संस्था. खासकरून सुवर्ण तारण कर्जाचा व्यवसाय या वित्तीय संस्थेनं वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. घरातील सोनं बँकेकडे तारण ठेवून तुम्ही व्यावसायासाठी किंवा घरगुती अडचणीसाठी कर्ज मिळवू शकता. अनेक कुटुंबांसाठी हा मोठा आधार होता. मुथूट फायनान्स कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत आहे. आणि सध्या या कंपनीचा शेअर आपल्या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या जवळही पोहोचला आहे. शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर १९६५ वर बंद झाला आहे. तो दिवसभरात ०.४९ टक्क्यांनी वर चढला. (Muthoot Finance Share Price)

Pic Courtesy@Google 4

पण, अलीकडे मुथूट फायनान्स किंवा मण्णापूरम गोल्ड सारख्या कंपन्यांच्या शेअरमध्ये १० टक्क्यांची घसऱण झाली आहे. दक्षिणेत घरांमध्ये सोनं मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे या बँकांचा सोने तारण कर्जाचा व्यावसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. पण, अलीकडे रिझर्व्ह बँकेनं सोने तारण कर्जाच्या काही व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं. एखादा हफ्ता चुका तरी तारण ठेवलेलं सोनं जप्त करणं, तारण ठेवलेल्या सोन्याचा गैरवापर असे आरोप सर्वच बँकांवर झाले. रिझर्व्ह बँकेनंही त्यांची दखल घेतली होती. (Muthoot Finance Share Price)

(हेही वाचा- Apollo Pharmacy : आधुनिक उपचार परवडणाऱ्या दरांत उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सुरू केली हॉस्पिटल साखळी)

या बातमीमुळे मुथूट फायनान्स कंपनीचा शेअर खाली आला. इतकंच नाही तर ऑगस्ट महिन्यात जाहीर झालेल्या तिमाही निकालातही कंपनीची कामगिरी चांगली नव्हती. व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षा व्यवहार आणि नफा कमी होता. या दोन बातम्यांचा विपरित परिणाम होऊन शेअर खाली आला आहे. जगभरातील मोठ्या संशोधन संस्थांनी मात्र हा शेअर अल्पावधीत आणखी खाली येणार असला तरी दीर्घ कालावधीत चांगला चालणार असल्याची ग्वाही दिली आहे. मोतीलाल ओस्वाल यांनी या शेअरला न्यूट्रल रेटिंग दिलं आहे. (Muthoot Finance Share Price)

(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. आणि हिंदुस्थान पोस्ट कुठल्याही शेअरवर खरेदी – विक्रीचा सल्ला देत नाही. वाचकांनी गुंतवणूक स्वत;च्या जोखमीवर आणि जाणकारांच्या सल्ल्याने करावी)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.