- म्हैसूर मसाला डोसा रेसिपी
आपल्यापैकी बरेच लोक असे असतील ज्यांना डोसा आवडतो. डोसा ही एक दक्षिण भारतीय डिश आहे. डोसा पचायला हलका असतो आणि डोसा करण्यासाठी तेलाचा वापरही कमी केला जातो. हल्ली वेगवेगळ्या प्रकारचे डोसे तयार केले जातात. जसं की, मसाला डोसा, रवा डोसा, नीर डोसा, पनीर डोसा अशा अनेक प्रकारे डोसा बनवता येतो. आज आम्ही तुम्हाला म्हैसूर मसाला डोसा कसा तयार करायचा ते सांगणार आहोत. (mysore masala dosa)
हा डोसा बाहेरून कुरकुरीत आणि आतून लाल चटणी लावून लेप केलेला असतो. या चटणीमुळे त्याची चव जास्त वाढते. हा डोसा खायला झणझणीत मसालेदार असतो. चला तर मग आपण म्हैसूर मसाला डोसाची रेसिपी पाहुयात… (mysore masala dosa)
- म्हैसूर मसाला डोसा कसा तयार करतात?
म्हैसूर मसाला डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी उडीद डाळ आणि तांदळाच्या पिठापासून पीठ तयार केलं जातं. त्यानंतर बटाट्याच्या भाजीचा मसाला तयार केला जातो. उडीद आणि तांदळाच्या पिठापासून डोसा तयार करतात. हा डोसा बाहेरून कुरकुरीत होतो. मग त्यावर लाल चटणी लावली जाते आणि त्यानंतर बटाटयाच्या भाजीचा मसाला त्यात भरला जातो. (mysore masala dosa)
- म्हैसूर मसाला डोसा कसा सर्व्ह करावा?
टोमॅटोची लाल चटणी, नारळाची चटणी किंवा सांबार सोबत म्हैसूर मसाला डोसा सर्व्ह करू शकता. तुम्ही म्हैसूर मसाला डोसा नाश्त्याला, दुपारच्या जेवणाला किंवा रात्रीच्या जेवणासाठीही केव्हाही तयार करून खाऊ शकता. (mysore masala dosa)
- म्हैसूर मसाला डोसा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य (पिठासाठी) :
१ कप थोडे शिजलेले तांदूळ
१/४ कप उडीद डाळ
३ चमचे तूरडाळ
३ चमचे रवा
१ टीस्पून मेथी दाणे
चवीनुसार मीठ
(हेही वाचा – IMF India Growth Forecast : भारताची अर्थव्यवस्था ७ टक्क्यांनी वाढेल असा नाणेनिधीचा सुधारित अंदाज)
-
बटाट्याच्या भाजीचा मसाला तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
पाव किलो बटाटे
१ कप बारीक चिरलेला कांदा
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
२ चमचे चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार मीठ
फोडणीसाठी तेल
१ टीस्पून मोहरी
कढीपत्त्याचा एक कोंब
- लाल चटणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य :
५-६ लसूण पाकळ्या
एक चिमूटभर आले
२ लाल मिरच्या
१ टेबलस्पून तळलेली चणाडाळ
चवीनुसार मीठ
-
म्हैसूर मसाला डोश्याचं पीठ कसं तयार करावं?
सर्वांत आधी रवा सोडून इतर सर्व साहित्य ४ तास भिजत ठेवा. ४ तासांनंतर त्यांत रवा, मीठ आणि पाणी मिसळा. त्याचं पीठ तयार करून ते रात्रभर झाकून ठेवा. (mysore masala dosa)
-
बटाट्याच्या भाजीचा मसाला कसा तयार करावा?
बटाटे उकडून थंड झाल्यावर ते मॅश करा. त्यानंतर आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची घालून चांगलं मिक्स करून घ्या. मग एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मग त्या कढईत बारीक चिरलेला कांदा घालून चांगला परतून घ्या. मग त्यात कढीपत्ता आणि बटाट्याचं तयार केलेलं मिश्रण घाला. (mysore masala dosa)
-
लाल चटणी कशी तयार करावी?
सर्वात आधी चणाडाळ मंद आचेवर परतून घ्या. त्यानंतर कांदा, लसूण आणि आलंसुद्धा तुम्ही थोडं परतून घेऊ शकता. हे सगळं साहित्य थंड झाल्यावर एकत्र वाटून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. (mysore masala dosa)
-
असा सर्व्ह करा डोसा :
सर्वात आधी डोश्याच्या तव्यावर थोडंस तेल गरम करून त्यावर डोश्याचं पीठ गोलाकार पसरून घ्या. मग त्यावर लाल चटणीचा लेप लावा. डोसा चांगला शिजवून घ्या. मग त्यावर बटाट्याच्या भाजीचा मसाला लावून घ्या. थोड्या वेळाने डोसा रोल करून तव्यावरून उतरवा. त्यानंतर लाल चटणी सांबार किंवा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा. (mysore masala dosa)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community