-
नाशिक इथली काही प्रसिद्ध मंदिरे
श्री काळाराम मंदिर
नाशिक शहरातल्या पंचवटी परिसरात हे श्री काळाराम मंदिर आहे. हे मंदिर सेंट्रल बस डेपोपासून ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी शहराच्या विविध भागांमधून सिटी बसेस आणि ऑटो रिक्षा उपलब्ध आहेत. हे मंदिर भगवान श्रीराम यांनी गुप्त वनवासात ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं, त्या ठिकाणी आहे. १७८२ साली सरदार रंगराव ओढेकर यांनी जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर हे मंदिर बांधलं होतं.
या मंदिराचं बांधकाम बारा वर्षं सुरू होतं. पश्चिम भारतातल्या श्रीरामाच्या मंदिरांपैकी हे सर्वांत सुंदर मंदिर आहे.
इथे चैत्र महिन्यात रामनवमीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. (nashik famous temple)
(हेही वाचा – world pulses day : १० फेब्रुवारीला का साजरा केला जातो जागतिक कडधान्य दिन?)
पंचवटी
पंचवटी हे नाशिक शहरातल्या गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर वसलेलं आहे.
श्री काळाराम मंदिराजवळ काही खूप जुनी आणि उंच वटवृक्ष आहेत. जी पाच वटवृक्षांपासून उगवलेली आहेत. म्हणूनच या ठिकाणाला पंचवटी असं नाव पडले. पंचवटीच्या आसपासच्या परिसरात श्रीकाळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, तालकुटेश्वर मंदिर, मंदिर, निळकंठेश्वर गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिलभंडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठल मंदिर, पाताळेश्वर मंदिर, नरोशंकर मंदिर, रामदुत मंदिर, करदुकटी मंदिर, कात्या मारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कातपुरथळा अशी अनेक मंदिरं आणि स्मारकं आहेत. (nashik famous temple)
(हेही वाचा – Droupadi Murmu यांनी प्रयागराज येथे केले संगमस्नान; कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती)
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे नाशिक शहरापासून सुमारे २८ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर येथे राज्य परिवहन मंडळाच्या बसने जाता येतं.
श्री त्र्यंबकेश्वर मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. धार्मिक केंद्र आहे. त्र्यंबकेश्वर शहर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. श्री त्र्यंबकेश्वर मंदिराची देखभाल त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टद्वारे केली जाते. इथे शिवप्रसाद भक्त निवासही बांधलेला आहे. या भक्त निवासात २४ खोल्या, एक कॉन्फरन्स हॉल, लिफ्ट आणि गरम पाण्याची सुविधाही आहे. (nashik famous temple)
(हेही वाचा – Mahakumbh 2025 : विदेशींनी जाणले महाकुंभ पर्वातील अमृत स्नानाचे महत्त्व)
श्री सप्तशृंगी गड, वणी
श्री सप्तशृंगी गड हा नाशिकपासून ६० किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे.
वणी इथलं सप्तशृंगी मंदिर हे सात शिखरांनी वेढलेल्या डोंगरावर वसलेलं आहे. महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी हे अर्धशक्तिपीठ आहे. या मंदिरात देवीची मूर्ती सुमारे आठ फूट उंच आहे. ही स्वयंभू मूर्ती खडकात कोरलेली आहे. या मूर्तीला अठरा हात आहेत. देवीच्या प्रत्येक हातात वेगवेगळी शस्त्रं आहेत. सप्तशृंग गड हे असं ठिकाण आहे, जिथे देवी भगवती वास करते.
सप्तशृंगीच्या डोंगरावर वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत. तसंच इथे कालीकुंड, सूर्यकुंड आणि दत्तात्रय कुंड असे कुंड आहेत. (nashik famous temple)
(हेही वाचा – Delhi निकालानंतर Shiv Sena UBT चे धाबे दणाणले; आघाडीसाठी लांगूलचालन!)
सीता गुंफा
नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकापासून ३ किलोमीटर एवढ्या अंतरावर पंचवटीच्या परिसरात सीता गुंफा आहे.
सीता माता वनवासाच्या काळात काही दिवस इथल्या गुंफांमध्ये राहिल्या होत्या. इथल्या मुख्य गुंफेमध्ये श्रीराम, सितामता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती आहेत. दुसऱ्या एका लहान गुंफेमध्ये एक शिवलिंग आहे.
येथूनच रावणाने सीता मातेचं अपहरण केलं होतं.
सीता गुंफासमोरच्या खोलीवर मरीच वध, सीताहरण अशी रामायणातील दृश्ये आहेत. (nashik famous temple)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community