Nasik Caves : नाशिकमध्ये किती गुंफा आहेत? आणि काय आहे त्यांचा इतिहास?

36
Nasik Caves : नाशिकमध्ये किती गुंफा आहेत? आणि काय आहे त्यांचा इतिहास?

नाशिक येथे असलेल्या गुहांना त्रिरश्मी लेणी, नाशिक लेणी आणि पांडव लेणी म्हणून ओळखलं जातं. या प्रसिद्ध गुहा नाशिक शहराच्या मध्यभागी सुमारे ८ किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला स्थित आहेत. या गुहेतल्या बहुतेक लेणी या बौद्ध विहार आहेत. (Nasik Caves)

यांपैकी १८ क्रमांकाची गुहा ही इ.स.पू. पहिल्या शतकातली चैत्य आहे. या लेण्यांपैकी ३ऱ्या आणि १०व्या लेण्यांच्या स्तंभांची शैली ही विकासाचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. पांडव लेणी इथली ११ क्रमांकाची गुहा ही जैन धर्माचे पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ यांना समर्पित आहे. या गुहांमध्ये हिंदू सनातन संस्कृतीशी मिळत्याजुळत्या अनेक गोष्टी आहेत त्यामुळे त्यांना पांडव लेणी असंही म्हटलं जातं. या परिसरातील इतर लेण्याही आहेत. जसं की, कार्ला लेणी, भाजा लेणी, पाटण लेणी आणि बेडसे लेणी होय. (Nasik Caves)

(हेही वाचा – वक्फ विधेयकाला विरोध करुन हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना शिवसेना उबाठाने कायमचे सोडले; DCM Eknath Shinde यांचा घणाघात)

नाशिक गुहा

नाशिक इथली प्रसिद्ध गुहा हा २४ हीनयान बौद्ध लेण्यांचा समूह आहे. या लेण्यांचं उत्खनन तत्कालीन स्थानिक जैन राजांनी केलं होतं. यांमधली ३ऱ्या क्रमांकाची गुहा ही एक मोठा विहार आहे. त्यांमध्ये काही मनोरंजक शिल्पे आहेत. तसंच १०व्या क्रमांकाची गुहादेखील एक विहार आहे. १०व्या गुहेची स्थापत्यशैली ही जवळजवळ ३ऱ्या क्रमांकाच्या गुहेसारखीच आहे. पण त्याची तपशीलवार पाहणी केली तर ती खूपच जुनी दिसून येईल. ही गुहा लोणावळ असलेल्या कार्ला गुहेइतकीच जुनी असल्याचं मानलं जातं. (Nasik Caves)

गुहांच्या या समूहातली १८व्या क्रमांकाची गुहा ही कार्ला इथल्या लेण्यांशी मिळतीजुळती आहे. या गुहेमध्ये अतिशय सुंदर कोरीवकाम केलेलं असून त्याचा विस्तृत दर्शनी भाग विशेषतः उल्लेखनीय आहे. या गुहेमध्ये देवी अंबिका, गौतम बुद्ध, जैन तीर्थंकर ऋषभदेव आणि जैन यक्ष मणिभद्र यांच्या मूर्ती आहेत. या लेण्यांचे आतले भाग हे सर्व शिष्यांसाठी लोकप्रिय भेटीचं ठिकाण होतं. या ठिकाणी गुरू आपल्या शिष्यांना प्रवचन देत असत. याव्यतिरिक्त इथे घन खडकातून कोरलेल्या पाण्याच्या टाक्याही आहेत. (Nasik Caves)

(हेही वाचा – Myanmar Earthquake : म्यानमार भूकंपामध्ये ३००० नागरिकांचा मृत्यू; १७०० जखमी)

नाशिकच्या या लेण्या महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक आहेत. त्यांपैकी काही लेण्या मोठ्या असून त्यांत असंख्य वेगवेगळे कक्ष आहेत. या दगडी कोरीव लेण्या भिक्षूंना भेटण्यासाठी, प्रवचन ऐकण्यासाठी, तसंच विहार किंवा मठ म्हणून वापरल्या जात होत्या. या लेणीमध्ये बुद्ध, बोधिसत्व, राजा, शेतकरी, व्यापारी यांचे प्रतिनिधित्व करणारी अनेक शिल्पे आहेत. ही शिल्पे इंडो-ग्रीक वास्तुकलेचं सुंदर मिश्रण दर्शविणारी एक समृद्ध प्रतिमा आहे. (Nasik Caves)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.